Samyaknews

नांदेड विभागातील विविध प्रवासी गाड्यांना कायमस्वरूपी चार जनरल कोचेसची वाढ

नांदेड विभागातील विविध प्रवासी गाड्यांना कायमस्वरूपी चार जनरल कोचेसची वाढ

प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर व अधिक सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील काही प्रवासी गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जनरल कोचेस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होईल.

खाली दिलेल्या प्रत्येक गाडीमध्ये 4 जनरल कोचेस (GS) कायमस्वरूपी वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्यांची रचना पूर्वीच्या 12 कोचेस वरून वाढून आता 16 कोचेस अशी होईल.

खालीलप्रमाणे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे :

1. गाडी क्र. 57651/57652 नांदेड – मनमाड – नांदेड प्रवासी गाडी
• नांदेडहून वाढ लागू दिनांक 08.11.2025 पासून
• मनमाडहून वाढ लागू दिनांक 09.11.2025 पासून

2. गाडी क्र. 57653 पूर्णा – आदिलाबाद प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 09.11.2025 पासून (पूर्णाहून)

3. गाडी क्र. 57654 आदिलाबाद – परळी वैजनाथ प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 10.11.2025 पासून (आदिलाबादहून)

4. गाडी क्र. 57655 परळी वैजनाथ – अकोला प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 10.11.2025 पासून (परळीहून)

5. गाडी क्र. 57656 अकोला – पूर्णा प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 11.11.2025 पासून (अकोलाहून)

6. गाडी क्र. 57657/57658 पूर्णा – परळी वैजनाथ – पूर्णा प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 11.11.2025 पासून (पूर्णा व परळीहून)

या निर्णयामुळे नांदेड विभागातील प्रवाशांना विशेषतः सामान्य वर्गात प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी बनेल.असा आशावाद दक्षिण मध्य रेल्वे तर्फे करण्यात येत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top