Home / मनोरंजन / स्वर उत्सव च्या गीतों की बरसात ला भरभरून प्रतिसाद ; अप्रतिम सादरीकरणाने सभागृह दणाणले

स्वर उत्सव च्या गीतों की बरसात ला भरभरून प्रतिसाद ; अप्रतिम सादरीकरणाने सभागृह दणाणले

स्वर उत्सव च्या गीतों की बरसात ला भरभरून प्रतिसाद ; अप्रतिम सादरीकरणाने सभागृह दणाणले.

नांदेड दि. 9(प्रतिनिधी)

येथील स्वर उत्सव फिल्म संगीत प्रतिष्ठान आयोजित गीतों की बरसात-आपके साथ या फिल्म संगीत कार्यक्रमात “जाने कहा गये वो दिन” या गीताच्या विषेश सादरीकरणाने सभागृह दणाणले. कधी नव्हे ईतक्या शिट्ट्या आणि टॉर्च प्रतिसाद या गीताला मिळाला. ईंजि गणेशसिंह चंदेल यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाला प्रदीप सोनटक्के यांचे उत्कृष्ठ दिग्दर्शन आणि निवेदन तर कृष्णा भालेराव यांचे सह दिग्दर्शन लाभले. गायक कलावंतांनी केलेले सादरीकरणाने एका दर्जेदार कार्यक्रमाची उपलब्धी नांदेडकर रसिकांना मिळाली.

स्वर उत्सव फिल्म संगीत प्रतिष्ठान ने सादर केलेली नवीन संकल्पना या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. एकाहून सरस सलग 20 गीतांचे नॉन स्टाप सादरीकरण करुन रसिकांच्या गत काळातील आठवणींना उजाळा दिला. शिवाय सुरेश इंदुरकर या कलावंताने विदुषी मेकअप मध्ये जाने कहा गये वो दिन या गीतांवर हुबेहूब राजकपूर यांचा अभिनय जिवंत करुन वन्स मोअर ची प्रचंड दाद मिळवली.दरम्यान लक्ष्मीकांत कुलकर्णी, विजय निलंगेकर,बालाजी उमरीवाड, डॉ राजेश पतंगे,शिवाजी टाक, ईंजि गणेशसिंह चंदेल, प्रदीप सोनटक्के, मंगेश क्षीरसागर,आनंद भोसले, माधुरी जाधव, अनु पांडे , ललीता डुलगच आणि डॉ मनिषा चाडावार आदींनी विविध गीत रचना सादर करुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.ऐनवेळी पावसाचा आलेला व्यत्यय धुडकावून रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल