पूरग्रस्त कुटुंबास 25000 रु. अनुदान द्यावे -प्रकाश मारावार
नांदेड – नांदेड महापालिकेने शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यास अपयशी. दिसाळ नियोजन . दिशाहीन महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले.
नांदेड महापालिकेत प्रशासक राज असल्यामुळे कोणाचेही नियंत्रण महापालिकेवर राहिले नाही.पावसाळापूर्वी नालीवरचे चेंबर. गटार. नालेसफाई झाली नसल्यामुळे. शहरातील अनेकांच्या घरात पाणी घुसले. सिमेंट काँक्रीट रस्त्यामुळे पाणी झिरपण्यास वाव मिळाला नाही.तसेच पावसाचे पाणी जाण्यास बंद नाली. उघडी नाली नसल्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले. वास्तविक नांदेड शहराचा संपूर्ण अभ्यास केले असता ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीट रोड.बंद नाली बांधकाम झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचराचा गंभीर प्रश्न महापालिकेसमोर उभा होता. असे असताना सुद्धा दिशाहीन महापालिकेने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. आपत्ती व्यवस्थापना सोबतच पावसाचा पाण्याचा निचरा तात्काळ करणारी यंत्रणा कार्यान्वित न ठेवल्यामुळे नांदेड शहरातील हजारो लोकांना त्रास झाला. संपूर्ण शहर पाण्यात डुबले. महापालिकेने. जिल्हा प्रशासन ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी घुसले त्या भागातील सरसकट भागाचा सर्वे करून प्रत्येकी कुटुंबास रुपये 25000 पूर अनुदान द्यावे. अशी मागणी दिशाहीन महापालिकेच्या आयुक्त.तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केली.











