Home / सामाजिक / नांदेड विमानतळ MIDC च्या गलथान कारभारामुळे बंद. उद्योगमंत्री जबाबदार -प्रकाश मारावार

नांदेड विमानतळ MIDC च्या गलथान कारभारामुळे बंद. उद्योगमंत्री जबाबदार -प्रकाश मारावार

नांदेड विमानतळ MIDC च्या गलथान कारभारामुळे बंद. उद्योगमंत्री जबाबदार -प्रकाश मारावार

नांदेड – नांदेड शहराच्या मध्यभागी बहुचर्चित असलेली नांदेड विमानतळ एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे उद्योग मंत्राच्या हट्टापायी बंद पडल्याचे आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले.
नांदेड विमानतळ अनेक वर्षापासून रिलायन्स समूहाच्या ताब्यात होते. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रिलायन्स समूहाला वेठीस धरून नांदेड विमानतळ रिलायन्स काढून घेतले. उद्योग मंत्राच्या अख्त्यारीत असलेले MIDC ला चालविण्यास दिले. वास्तविक पाहता एमआयडीसी च्या निष्काळीपणामुळे अनेक मोठे मोठे उद्योगधंदे बंद पडत आहेत. उद्योगाला चालना देण्याऐवजी भूखंडाचे श्रीखंड कशाप्रकारे होईल याच्यातच एमआयडीसीचे अधिकारी मशगुल आहेत.असे असताना. विमानतळ चालवण्याचा अनुभव एमआयडीसीला शून्य असताना नांदेड विमानतळ एमआयडीसीला चालविण्यासाठी उद्योग मंत्राच्या हट्टपायी रिलायन्स समूहाला वेठीस धरून नांदेड विमानतळ खड्ड्यात टाकले. अनुभव शून्य MIDC. धावपट्टीवर भेगा पडत असताना MIDC झोपा काढत होती का?. नांदेड विमानतळा येथून दररोज शेकडो प्रवासी जगप्रसिद्ध गुरुद्वारा. माहूरगडची रेणुका माता. दर्शनासाठी तसेच आजूबाजूचे चार जिल्हे दळणवळणासाठी रोज 500 प्रवासी ये जा विमानाने करत असतात. अचानकपणे धावपट्टीला भेगा पडल्याचे कारण सांगून विमानतळ बंद पाडणे म्हणजे दाल मे कुछ काला है. उद्योग मंत्री उदय सामंत यांना नांदेड विमानतळ परत कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न दिसतो. असा गंभीर आरोप मारावार यांनी केला. एमआयडीसीच्या अधिकारी मलिदाखान्यामध्ये व्यस्त होते. त्यांना नांदेड विमानतळाचं काही घेणं देणं नव्हतं बळजबरीने दिलेला कारभार. एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे नांदेड विमानतळ बंद पडले असून याला उद्योग मंत्री उदय सामंत जबाबदार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल