*नांदेड जिल्ह्यातील न्यायालयासमोरील नवीन इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची मागणी*
नांदेड – नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले असून, जिल्हा न्यायालया च्या नवीन इमारतीसमोर भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात बहुजन समाज पार्टीचे मराठवाडा झोन प्रभारी मनीषभाऊ कावळे यांनी नमूद केले आहे की, नांदेड जिल्ह्यातील न्याय व्यवस्थेचे प्रतीक असलेल्या मुख्य न्यायालयासमोर संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांचा पुतळा असणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकशाहीचे मूल्य आणि संविधानाचे महत्व जनतेपर्यंत पोहोचेल.
निवेदन देताना बसपाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव ढाकोरे, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.











