Home / सामाजिक / आ. चिखलीकर यांचा वाढदिवस औषधीतुला , पुस्तकतुलानी साजरा

आ. चिखलीकर यांचा वाढदिवस औषधीतुला , पुस्तकतुलानी साजरा

आ. चिखलीकर यांचा वाढदिवस औषधीतुला , पुस्तकतुलानी साजरा
नांदेड : लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा नांदेड लोकसभा मतदारसंघाची माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यात प्रामुख्याने रुग्णांसाठी औषधीतुला , विद्यार्थ्यांसाठी पुस्तकतुला आणि भाविक भक्तांसाठी शर्करीतुला या कार्यक्रमांचा समावेश होता.
आपल्या कृतीतून मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या हृदयात घर करणारे लोकप्रिय आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे सतत समाजसेवेसाठी झटत आणि झगडत असतात. गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून येत असताना सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी त्यांचा सततचा पाठपुरावा सुरू असतो . शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण मिळावे , त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी ही त्यांचा सतत आग्रह असतो . एकूणच आ. चिखलीकर यांची ही लोक तळमळ लक्षात घेता काल त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला . शोभाताई बागडे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली . हे साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्याचवेळी कंधार येथे बाळासाहेब रामराव पवार यांच्या पुढाकारातून कंधार येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी औषधी तुला करण्यात आली. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भारोभार औषधी तुला करून ही सर्व औषधी कंधारच्या शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली तर व्यंकट नागलवाड यांच्या पुढाकारातून शर्करा तुला करण्यात आली. पांगरा येथील कै. विश्वनाथराव कौशल्य माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही यावेळी वाटप करण्यात आले . आ. चिखलीकर यांचा प्रत्यक्ष कृतिशीलतेतून वाढदिवस साजरा करण्यात आला . या सर्वच कार्यक्रमाला प्रचंड गर्दी उसळली होती. प्रत्येक ठिकाणी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे जंगी स्वागतही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल