Home / शैक्षणिक / सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल ; सर्वोकृष्ट रँकसोबतच-नीट मध्ये जम्बो निकाल

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल ; सर्वोकृष्ट रँकसोबतच-नीट मध्ये जम्बो निकाल

नीट परीक्षा ही भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची एकमेव राष्ट्रीय प्रवेश परीक्षा असून, यामार्फत MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS आणि BSc Nursing यांसारख्या कोर्सेससाठी प्रवेश दिला जातो. ही परीक्षा दरवर्षी NTA (National Testing Agency) तर्फे घेण्यात येते आणि देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतात. NEET ही पेन-पेपर पद्धतीने घेतली जाते, ज्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवर आधारित १८० बहुपर्यायी प्रश्न असतात आणि एकूण ७२० गुणांची परीक्षा असते. परीक्षेतील यशानंतर विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो, त्यामुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा मानली जाते.

आयआयबी ने १९९९ पासून मराठवाडा आणि महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालात आतापर्यंत अनेक उच्चांक प्रस्थापित केलेले आहेत. आयआयबी च्या विद्यार्थ्यांनी नीट २०२५ च्या निकालातही सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये श्रेयस डमके ६१३-कॅट-रँक १८४, बोदडे स्वरूप ६११ कॅट-रँक २०९, केंद्रे अपूर्वा ६०६ कॅट-रँक २९७, भेन्डेकर कार्तिक ६०४ कॅट-रँक ३३९, प्रियांशु मनोहर ५९६, खाकरे हर्षद ५९४, मुटकुळे शिवम ५९१, गांधी आयुष ५८९, वाघमारे मकरंद ५८३, खर्चे रोहन ५७८,शेख हुजेफ ५७९, कोकणे क्षिती ५७८, उम्बरेकर यश ५७७, चव्हाण मयांक ५७५ मार्क्स मिळवले आहेत.

यावर्षी एम्स आणि जीएमसी एमबीबीएस साठी पात्र ठरण्याचा टक्का वाढेल असा विश्वास टीम आयआयबी ने व्यक्त केला. दरवर्षीच्या निकालात विद्यार्थ्यांच्या मार्क्स ची चर्चा होते परंतु यावर्षी रंक्स ची चर्चा अधिक असल्याचे दिसते. यावर्षी नीट च्या पेपर ची काठीण्य पातळी वाढूनही आयआयबी च्या विद्यार्थ्याना मागील वर्षीच्या तुलनेत अधिक जागा मिळतील असा अंदाज टीम आयआयबी ने माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

आयआयबी च्या अवघड परीक्षांचा निकालात मोठा वाटा

नीट २०२५ परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले कि आयआयबी मध्ये उत्कृष्ट कोचिंग सोबतच टेस्ट सिरीजहि अत्यंत चांगल्या आणि दर्जेदार पद्धतीने घेतल्या जातात. असर्षण रिजन चे प्रश्न, लेंदी प्रश्न, क्रिटीकल प्रश्न यांचा स्टडी मटेरीअल मध्ये समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारच्या तयारीमुळेच नीट मध्ये यश मिळाले असल्याचे विद्यार्थी आणि पालकांनी बोलून दाखवले.

निकालातील सातत्य हेच आयआयबी चे यश, केवळ योगायोग नाही तर २५ वर्षांची परंपरा कायम: संचालक दशरथ पाटील

नीट २०२५ चा निकाल हा केवळ योगायोग नसून दरवर्षी प्रमाणे याही वर्षीच्या निकालात मागील २५ वर्षांची सर्वोकृष्ट निकालाची परंपरा कायम राखण्यात टीम आयआयबी आणि विद्यार्थी यशस्वी ठरल्याचे श्री. दशरथ पाटील म्हणाले. यापुढेही असाच उच्चांक कायम राखत विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वास कायम राखण्यास आयआयबी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगिलते. विद्यार्थी पालकांचा विश्वास हा आमच्या मेहनतीची प्रेरणा असून त्यांच्या विश्वासामुळेच हे यश मिळाले असल्याचे दशरथ पाटील यांनी अभिमानाने सांगितले.

आयआयटी-सीईटी च्या निकालातही आयआयबी ची मुहूर्तमेढ

आयआयबी च्या तिघांना मिळणार आयआयटी मध्ये प्रवेश शुभ्रा कदम, विश्ववरद कांबळे, निहाल जाधव यांना आयआयटी मध्ये प्रवेश मिळेल तर सीईटी पीसीएम ग्रुप मधून ९९ च्या वर गुण मिळवणारे एकूण ७ विद्यार्थी असून चव्हाण स्वरूप ९९.४२, सरपोतदार समीरा ९९.४२, कासले समीक्षा ९९.३९, पाटील प्रज्वल ९९.३१, कदम प्रीती ९९.२९, कुंभार सिद्धी ९९.१०, चव्हाण स्वप्नील ९९.०७ इतर १३२ विद्यार्थ्यांना ९० च्या वर गुण मिळाले आहेत. सर्व विद्यार्थ्यी आणि पालकांनी टीम आयआयबी वरील विश्वास हेच आमच्या यशाचे रहस्य असल्याचे सांगितले.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल