Home / राजकारण / आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडे यांची संगीत संध्या

आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडे यांची संगीत संध्या

आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडे यांची संगीत संध्या

नांदेड दि. 30 मे :
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक जून रोजी सायंकाळी 7 वाजता ए. के. संभाजी मंगल कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची संगीत संध्या आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान सकाळी 10 वाजता मरळक येथे भव्य कीर्तन आणि आरोग्य तपासणी शिबाराचे आयोजन करण्यात आला आहे.
जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची असंख्य कामे करून लोकांना खरा दिलासा देणारे लोकनायक आ. बालाजीराव कल्याणकर यांचा वाढदिवस 1 जून रोजी याही वर्षी विविध सामाजिक कार्यक्रमाने आणि धार्मिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी दहा वाजता मरळक येथे सकाळी दहा वाजता हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याचवेळी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर ही आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत संध्या या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ए.के संभाजी मंगल कार्यालयात सायंकाळी सात वाजता संगीत रजनीचा कार्यक्रम रंगणार आहे . तत्पूरी सायंकाळी पाच वाजता आ.बालाजीराव कल्याणकर ए के संभाजी मंगल कार्यालयात जनतेच्या गाठीभेटी घेतील. आयोजित करण्यात आलेल्या संगीत संध्या कार्यक्रमाला आणि मरळक येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळा आणि आरोग्य शिबिराला आणि अभिष्टचिंतन सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी केले आहे .

ए के संभाजी मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता आ. कल्याणकर घेणार भेटीगाठी
आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त ए के संभाजी मंगल कार्यालय येथे संगीत संध्या आयोजित करण्यात आली असून सायंकाळी पाच वाजता आ. कल्याणकर जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत.

मरळक येथे कीर्तन आणि आरोग्य शिबिर
आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त मरळक येथील विमलेश्वर मंदिर येथे हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनाचा सोहळा सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला असून याच वेळी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिर ही आयोजित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल