Home / राज्य / कोनाळे अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले; ११ मे रोजी मंत्रालयात सुनावणी

कोनाळे अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले; ११ मे रोजी मंत्रालयात सुनावणी

कोनाळे अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले; ११ मे रोजी मंत्रालयात सुनावणी

मनपा आयुक्त महेश डोईफोडे कारवाई करणार की पाठीशी घालणार? नागरिकांचे लक्ष केंद्रित

नांदेड दि. ७ मे

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील झोन क्रमांक ०३, शिवाजीनगर येथील कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून या प्रकरणाची सुनावणी येत्या ११ मे २०२६ रोजी मंत्रालयात होणार आहे. तसेच, रमेश चवरे यांची स्टेडियम व्यवस्थापक (क्रीडा अधिकारी) पदावरील नियुक्तीही आवश्यक पात्रतेअभावी बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगर विकास विभागाच्या अवर सचिव जयंत वाणी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी पाठविण्यात आलेल्या चौकशी अहवालासंदर्भातील पत्राला मनपाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे मंत्रालयाने थेट सुनावणीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत बांधकामाबाबत सहाय्यक आयुक्त रमेश चवरे यांनी २०२३ मध्ये मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ५३ व ५४ अंतर्गत आणि सप्टेंबर २०२५ मध्ये कलम २६० अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस देऊनही दोन वर्षे कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे तक्रारदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारदारांचे म्हणणे आहे की, या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. तसेच, २०२५ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत या प्रकरणात कारवाई टाळली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे व पंकज कांबळे यांनी केला असून त्यानंतरच मंत्रालयाने सुनावणी निश्चित केली आहे. दरम्यान, मनपा आयुक्त महेश डोईफोडे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह मंत्रालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, मनपा प्रशासन खरोखरच कारवाई करणार की अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालणार, याकडे आता संपूर्ण नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल