Home / सामाजिक / उपअभियंता पदावर असलेला बौद्ध अधिकारी महापालिकेचा शिपाई आहे का ?

उपअभियंता पदावर असलेला बौद्ध अधिकारी महापालिकेचा शिपाई आहे का ?

उपअभियंता पदावर असलेला बौद्ध अधिकारी महापालिकेचा शिपाई आहे का ?

नांदेड – दि.7 मे 26
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत अजब कारभार सुरू झाला असून बौद्ध अधिकारी असला तरीही त्यास शिपायाची कामे करावे लागणार आहे आपल्या दालनाचे दार बंद न करता कार्यालय सोडल्याच्या निमित्त करून उपअभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा प्रकार महापालिकेत घडला आहे

नांदेड वाघाळा महानगरपालिकेत उप अभियंता या पदावर ढवळे या नावाचा बौद्ध व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे त्यांच्याकडे नांदेड शहरातील सर्व विद्युत विभाग असून तो आजपर्यंत काम तत्पर्तने करत आला आहे केवळ आकसापोटी यांना निलंबित केल्याचे आता महानगरपालिकेत बोलले जात आहे.

आज दिनांक सात मे रोजी ढवळे यांना निलंबित केले असल्याचे पत्र देण्यात आले व त्यावर कारण असे लिहिले आहे की कार्यालयात उशिरापर्यंत राहून कार्यालयाचे दार बंद न करता आपण निघून गेलात यामुळे शिस्तभंग झाला असून आपणाला निलंबित करण्यात येत आहे. हे कारण पाहता उप अभियंता या पदावरील व्यक्तीने कार्यालयाचे दार बंद करून जावे हा नवीन नियम केवळ बौद्ध व्यक्तीसाठी महापालिकेने लागू केला का अशी चर्चा आता ऐकव्यास मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत सर्व समाजातील कर्मचारी अधिकारी आपल्या आपल्या पद्धतीने एकत्रितपणे काम करत असताना मागच्या काही दिवसापासून मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यावर अन्याय करण्याचा प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे नांदेड शहरातील देगलूर नका परिसरात घडलेल्या घटनेवर कारवाई करत असताना मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजातील कर्मचाऱ्यांवरतीच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले ज्यांच्या अधिनस्त ते कामे झाली त्यांना मात्र क्लीन चीट दिल्याचे दिसून येत आहे कारण तो उच्चवर्णी असल्याचे बोलल्या जात आहे . असाच प्रकार महापालिकेत चालू असेल तर उद्रेक होऊन मोठ्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ महापालिकेवर येईल असे बोलले जात आहे.

उपअभियंता आपल्या कार्यालयात काम करत असताना कामाचा व्याप पाहून त्यांना वेळ लागला म्हणून ते काम करत होते परंतु आस्थापनेवर असलेले कार्यालयीन अधीक्षक मो. सादिक हे रात्री साडेआठ वाजता महापालिकेत काय करत होते याचा खुलासा आयुक्तांनी त्यांना विचारला पाहिजे होते

रात्री साडेआठ वाजता मोहम्मद सादिक हे महापालिकेच्या इमारतीमध्ये कोणते अधिकारी आहेत हे पाहण्यासाठी आले होते का आणि त्यांनी उपअभियंतास ढवळे यांच्या कार्यालयात जाऊन फोटो काढला तर त्यांना केवळ त्याच्या खबऱ्याने माहिती दिल्याने फोटो काढण्यासाठी आले होते का आणि फोटो काढण्याचा हेतू त्यांना निलंबन करण्याचे होते का हे मात्र आता गुलदस्तात राहिलेलं नाही

निलंबन करण्याची कारवाई करण्या अगोदर कारणे दाखवा नोटीस देऊन त्याचे उत्तर देण्यास वेळ द्यावा लागतो परंतु दिनांक 6 मे रोजी कारणे देवका नोटीस देऊन सात रोजी निलंबित केल्याने या पाठीमागे काहीतरी शिजत असल्याचेही चर्चा आता महापालिकेत होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल