Home / राजकारण / सुमंत पाटील यांच्यावर मनप आयुक्त डोईफोडे यांची कृपादृष्टी का ?

सुमंत पाटील यांच्यावर मनप आयुक्त डोईफोडे यांची कृपादृष्टी का ?

सुमंत पाटील यांच्यावर मनपा आयुक्त डोईफोडे यांची कृपादृष्टी का ?

नांदेड (विजय निलंगेकर )
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या उपअभियंता पदावर अनेक उपक्रम राबवून पदस्थापना मिळवलेल्या सुमंत पाटील यांच्यावर मनपा आयुक्त डोईफोडे यांची कृपादृष्टी का अशी चर्चा आता शहरांमध्ये ऐकव्यास मिळत आहे

महानगरपालिकेच्या उप अभियंता या पदावर सुमंत पाटील यांची सिडको येथून राजीनामा देऊन नांदेड येथे पदस्थापना मिळवलेल्या पाटील यांच्यावर अगोदरच कृपादृष्टी ठेवून त्यांना शहर अभियंता या पदावर आयुक्त आणि बसविले परंतु शहर अभियंता पदावर काम करत असताना झालेल्या दिरंगाई ची सजा मात्र कनिष्ठ अधिकारी आणि असंबंधित अधिकाऱ्यांना मिळाल्याची चर्चा आता चवीने चर्चिला जात आहे वास्तविक देगलूर नाका परिसरातील डबक्यात पडून चार मुलांचा मृत्यू झाला या मृत्यूला कारणीभूत महापालिकेतील अधिकारी व गुत्तेदार प्लॉट धारक यांना ठरवून मनपायुक्त यांनी काहींना निलंबित केले तर काहींना निलंबित का करू नये अशा नोटीस पाठवल्या परंतु ज्यांच्या अधिपत्याखाली हे काम चालतं ते सुमन पाटील यांना मात्र क्लीन चीट दिल्याचे दिसून येत आहे असे का झाले याची चर्चा आता रंगू आली आहे.

सुमन पाटील यांना पदस्थापना देताना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग करून पदस्थापना देण्यात आली आता या प्रकरणात सुमन पाटील यांना निलंबित केले तर त्यांचे भविष्य काय असा विचार करून मनपा आयुक्त यांनी त्यांच्या भविष्याला हिरवा कंदील दिला आहे. काल दिवसभर चर्चेत असे कळते की सुमन पाटील यांना अतिरिक्त आयुक्त या पदावर प्रभारी म्हणून बसवायचे आहे सध्याचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची तीन वर्षानंतर सेवानिवृत्ती आहे व सेवानिवृत्ती झालेल्या या रिक्त पदावर सुमंत पाटील यांना बसविण्याचा घाट आतापासूनच सुरू असल्याची चर्चा आहे आज शहर अभियंता पदावर पदस्थापना देताना ज्येष्ठता यादी डावलण्यात आलीच आहे तसेच अतिरिक्त आयुक्त पद देण्यासाठी आणखी तीन वर्षे आहेत आणि तीन वर्षाची जेष्ठता यादी लागू करून अतिरिक्त आयुक्तांचा पदभार देण्याचा हा घाट असल्याचे आता ऐकव्यास मिळत आहे सुमंत पाटील यांच्यासाठी एवढी मेहर नजर का असे प्रश्न आता निर्माण होत आहे देगलूर नाका प्रकरणात ज्या पाच अधिकारी यांना निलंबित व नोटीस पाठवल्या हे सर्व सुमंत पाटील यांना वरिष्ठ आहेत आणि यांना अशा प्रकरणात कारणीभूत ठरवून त्यांच्या नोकरीवर एक प्रकारचा धब्बा लावण्याचा हा आयुक्तांचा प्रयत्न असल्याचेही चर्चा आहे या पाच जणांना या प्रकरणात गोवल्याने सुमंत पाटील यांचा मार्ग सुकर झाल्याची चर्चाही ऐकव्यास मिळत आहे.

सुमंत पाटील यांच्या पदस्थापनेवरून अनेकांनी तक्रारी केल्या असून या तक्रारीकडेही आयुक्त कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे नव्यानेच नियुक्त झालेल्या नगरसेवकांनीही सुमन पाटील यांच्या पदस्थापनेवर आक्षेप घेतल्याचे कळते परंतु सत्तेमध्ये असलेल्या नगरसेवकांनी छुपी साधल्याची ही चर्चा आता ऐकावयास मिळत आहे देगलूर नका परिसरातील प्रकरणात महापौर कविता मुळे यांनी पीडितांच्या परिवाराला भेटून शोक व्यक्त केला परंतु हे नाटक करण्यापेक्षा याला जबाबदार असलेले शहर अभियंता सुमंत पाटील यांच्यावर कारवाई केली असती तर त्या पिढीत परिवारांना न्याय मिळाला असता अशी चर्चा आता देगलूर परिसरामध्ये ऐकवयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल