Home / राजकारण / शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारणी अमर राजूरकर समोर तग धरेल का

शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारणी अमर राजूरकर समोर तग धरेल का

शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारणी अमर राजूरकर समोर तग धरेल का
नांदेड – काँग्रेस पक्षाने नुकतेच शहर काँग्रेसच्या जम्बो कार्यकारीनी ची घोषणा केली असून या कार्यकारणी मध्ये जवळजवळ 90 टक्के चेहरे नवीन असून ही सर्व मंडळी तत्कालीन परिस्थितीत आणि सध्याचे भाजपाचे महानगर अध्यक्ष अमर राजूरकर यांच्या हाताखाली कार्य केलेल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली असून ही कार्यकर्ते भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर समोर तग धरतील का अशी चर्चा आता रंगू लागली आहे
माजी महापौर व काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी प्रदीर्घ काळानंतर कार्यकारणीची मान्यता मिळवली असली तरी या कार्यकारणी मध्ये सर्वच कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वास मान्यता देऊन काम केलेले असल्याने हे सर्व मंडळी भाजपाला योग्य उत्तर देतील का अशी शंका उत्पन्न होत आहे असे असले तरी काँग्रेस पक्षाने शहर कार्याध्यक्षपदी किशोर भवरे, महेश देशमुख आणि बालाजी चव्हाण यांची निवड केली आहे तसेच आनंद चव्हाण, रमेश गोडबोले, शेख हुसेन शमदमिया, शोयेब हुसेन मजहर हुसेन, पप्पू शर्मा, शेख मुख्तार शेख आलम, गगन यादव, अलीम खान अब्दुल हमीद, अब्दुल खादर फिरोज भाई, सय्यद असलम आणि सय्यद खान यांच्यावर उपाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे तसेच काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आणि एकनिष्ठ राहिलेले मुन्ना उर्फ अब्बास हुसेन यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर रमेश चित्ते एड. विलास भोसले, आनंदराव कल्याणकर, अंबादास राठोड, डॉ. मोहम्मद असिफ इब्राहिम, मनोज सिंह ठाकुर, शेख हबीब, गौतम शिरसाट तुषार पोहरे, नागराज सुलगेकर, नईम शेख, अब्दुल रौफ गफूर आणि सय्यद रिझवान पटेल यांची सरचिटणीस पदी निवड केली आहे तर सचिव पदी सुरेश पवार, मधुकर सकते,के अब्दुल वाहब रजाक, संजय शर्मा, युसुफ खान, गणेश गोपीनाथ, अमोल जाधव, मगदूम पाशा यांची निवड करण्यात आली आहे तर सहसचिव पदी संदीप गिरी, अब्दुल मुजीब रहीम, चंद्रकांत बोरगावकर आणि शेख जावेद यांची निवड करण्यात आली आहे तर धनंजय उमरेकर, विनायक कोकाटे, चंद्रमुनी कांबळे, श्रीमती विमल पंडित आणि मायकल जगदाळे यांची संघटन सचिव पदी तर शेख कलीम आणि दत्ता गायकवाड यांची संघटन सहसचिव पदी नियुक्त करण्यात आली आहे या जम्बो कारणे कमी मध्ये एकूण 52 कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली असून ही फळी भाजपाला तोंड देऊ शकते का याचाही पूर्ण विचार करून तशी ताकद काँग्रेस पक्षाने या 52 लोकांना दिल्याचे कळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल