खा.श्रीकांत शिंदे म्हणतात अनौपचारिक गप्पा तर आ.चिखलीकर म्हणतात विधान परिषदेवर चर्चा झाली
नांदेड – विजय निलंगेकर
नांदेड विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया चालू असून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट हे सत्तेत असून त्यांच्याकडून उमेदवार खा. अशोकराव चव्हाण सांगतील ते अशी परिस्थिती नांदेडमध्ये असल्याने आ. प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी चालू केली आहे काल शिव संवाद दौऱ्यानिमित्ताने खा. श्रीकांत शिंदे नांदेड मध्ये आले असता आ. चिखलीकर आणि खा. शिंदे यांची रात्री भेट झाली या भेटीदरम्यानची चर्चा नांदेडमध्ये चर्चेली जात असतानाच आज एका कार्यक्रमात खा. शिंदे यांना विचारले असता अशी काही राजकीय चर्चा झालीच नाही असे ते म्हणाले
प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयातून एक प्रेस नोट पाठविले असून या वृत्तामध्ये आ. प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे सहकारी तसेच खा. श्रीकांत शिंदे आणि त्यांचे सहकारी यांची रात्री भेट झाली असून विधानपरिषदेच्या निवडणुकीवर चर्चा झाली असल्याचे स्पष्ट केले आहे तसेच ही चर्चा नांदेड शहरांमध्ये सकाळपासूनच चालू होती परंतु आज खा. श्रीकांत शिंदे हे नायगाव येथील कार्यक्रमासाठी उपस्थित असता पत्रकारांनी रात्रीच्या भेटीवरती चर्चा केली असता ते म्हणाले की एक अनौपचारिक भेट होती आ. प्रताप पाटील चिखलीकर आणि आम्ही फार जुने मित्र असून लोकसभेत आम्ही एकत्रित काम केले आहे आणि ते युती घटकातील सदस्य असल्याने त्यांची भेट झालेली आहे विधान परिषदेवर कुठलीही चर्चा झाली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधान परिषदेचे निवडणुकीचे वारे वाहत असताना अशी घटना घडणे साहजिक आहे परंतु भेट झालेल्या दोन्ही उभयतांनी वेगवेगळे स्टेटमेंट देणे म्हणजे परत एकदा वादाला तोंड फुटते की काय अशी चर्चा आता नांदेड राजकारणात बोलल्या जात आहे










One Comment
It’s actually a cool and helpful piece of info. I’m glad that you just shared this helpful information with us. Please keep us up to date like this. Thank you for sharing.