सिने गायक कुमार सानू यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी गायलेल्या गीतांचे सादरीकरण
नांदेड – सिनेसृष्टीतील 1990 च्या दशकात युवकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार गायक कुमार सानू यांच्या वाढदिवसानिमित्ताने नांदेडमध्ये संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
भारतीय सिनेमा जगतात 1990 चा दशक म्हणजे संगीतमय गीतांचा काळ राहिला आहे या काळात उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य, विनोद राठोड, यांच्यासह कुमार सानू जो की पश्चिम बंगाल या राज्यातून येतो त्यांनी आपल्या आवाजाने युवकांच्या हृदयावर अधिराज्य केले त्या काळात केवळ भारतीयांना संगीतमय ठेवण्यासाठी टी सिरीज चे मालक गुलशन कुमार यांनी कुमार सानू यांच्यासाठी अनेक गाण्याचे अल्बम काढले व नंतर त्याचे सिनेमा काढण्यात आले कुमार सानू चे गाणे भारतीयांना एवढे आवडायला लागले की त्या गाण्याचे सिनेमात रूपांतर होत गेले 24 तासात 28 गाणे गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ही त्यांनी केला आहे अशा या हुरहुन्नरी गायक कलाकारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी गायलेल्या गीतांचे सादरीकरण विजय निलंगेकर प्रस्तुत बेताबिया या कार्यक्रमात होणार आहे 
गेले तीन वर्षापासून विजय निलंगेकर यांच्यातर्फे कुमार सानू यांच्या वाढदिवसानिमित्ताने नांदेड येथे कार्यक्रम घेतल्या जातो हे चौथ वर्ष असून या कार्यक्रमात गायक कलाकार म्हणून पत्रकार विजय निलंगेकर, डॉक्टर संदीप रायसोनी, शिवाजी टाक, डॉक्टर राजेश पतंगे, सतीश मुधोळकर, कुमारी वैष्णवी पारवेकर, सुजाता खाडे (पुसद) व माधुरी जाधव हे कलाकार सादर करतील दिवाळीच्या पूर्वसंध्येला नांदेडकरांना संगीतमय मेजवानी देण्याचा प्रयत्न होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आव्हान पत्रकार विजय निलंगेकर यांच्यातर्फे करण्यात येत आहे











