Home / गुन्हा / अटी नियमाचे उल्लंघन करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाळे बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

अटी नियमाचे उल्लंघन करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाळे बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

अटी नियमाचे उल्लंघन करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाळे बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

नांदेड, दि. १० ऑक्टोबर-कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड मध्ये असलेल्या व्यापारी गाळयांचे लिलावाव्दारे वाटपास कलम १२ (१) चे उल्लंघण करणे, ना.वा.श.म.न.पा. ने दिलेल्या बांधकाम परवान्याचे उल्लंघन करुन नकाशा रहीत बांधकाम, प्रति नं. १ यांनी दिलेल्या मंजुरीपत्र जा.क्र. ६२२१/२०२४ दि.१३/९/२०२४ चे पालन न करणे, बांधकामाच्या निविदेत / टेंडर मंजुरीचे दि. २५ सप्टेंबर २०२४ चे पत्राचे उल्लंघन करणे, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड मुख्य व उपबाजारातील भुखंड भाडेपट्याने न देता अप्रत्यक्षपणे विक्री करणे, गाळे लिलावासंदर्भात प्रसिद्ध दैनीकात जाहीर प्रगटन न देणे, नियम व अटीचे पालन न करता गाळे विक्री करणे, नवीन व्यापारी गाळे बांधणे, परवानगी तळमजल्याची असतांना पहिला मजला बांधणे कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या ठरावाची प्रती न देणे अशा अनेक नियमांना तिलांजली देऊन कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडच्या मोकळया भूखंडाचे लचके तोडणाऱ्यावर कायदेशीी
कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अॅड. प्रमोद नरवाडे यांनी दिला आहे.

या संदर्भाने तक्रार केजल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने जि माहिती दिली ती संश्यास्पद व अपूर्ण उत्तरे देण्यात आली असल्याचे अॅड. प्रमोद नरवाडे यांनी निवेदात नमुद केले आहे.
एस.बी.आय. बैंक नवा मोंढा, च्या पुर्वेस तळमजला आणि पहिला मजला असे बांधकाम करण्यात आले आहे. त्यासंबंधी ज्या दैनिकामध्ये जाहीर प्रगटन टाकण्यात आले होते त्या संबंधीची माहिती अपूर्ण आहे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका नांदेड चा बांधकाम परवाना क्र. ५२८ दि. १५/०३/२०१२ ची अंतरिम मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले असुन त्याला १३ वर्ष पुर्ण झाले आहेत त्यासाठी फक्त १ वर्षाची मुदत असते ती १५/४/२०१३ ला संपललेली आहे. मंजुरी पेक्षा जास्त प्रमाणात व्यापारी गाळण्यात बांधण्यात आले आहेत.त्यातच बांधकाम परवान्याविषयी कोणताही सबळ पुरावा त्यांच्या उत्तरात दिलेला नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे व्यापारी गाळे बांधकाम संदर्भात निधीचा पुरवठा आणि त्या खर्चाबाबत जे पुरावे दिले आहेत ते दि. ०१/०८/२०२४ चे आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मंजुरी आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेने दिलेलया बांधकाम परवान्याच्या कालावधीमध्ये फरक स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे बांधकाम शेतकऱ्याच्या विकासासाठी आणि सोई सुविधेसाठी गाळयाचे बांधकाम केले नसुन सर्व संचालकांनी स्वतःच्या स्वार्थसाठी आणि आर्थिक लाभमिळवण्यासाठी व्यापारी गाळयाचे बांधकाम केले असुन कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडच्या मोकळया भुखंडामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या तळमजला आणि पहिला मजला यासंपुर्ण गाळयांची आपण सविस्तर चौकशी करावी आणि संबंधीत संचालक व सचिव यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी सनदशिर मार्गाने आंदोलन उपोषण करण्यात येईल याउपरही न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा ईशारा अॅड. प्रमोद नरवाडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल