धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यास जाण्यासाठी रेल्वेतर्फे दोन विशेष रेल्वे गाड्या
नांदेड – धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्याकरिता बौद्ध जणांना जाण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दोन फेऱ्या जाण्यासाठी आणि दोन फेऱ्या येण्यासाठी अशी व्यवस्था केली आहे तरी या गाड्यांचा लाभ घेण्यात यावा असे आव्हान दक्षिण मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मार्फत नांदेड ते नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे:
🚆 विशेष रेल्वेगाडी सेवा तपशील
गाडी क्रमांक 07085 नांदेड ते नागपूर हि गाडी मुदखेड, भोकर, हिमायत नगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळकुट्टी मार्गे धावेल.
हि गाडी नांदेड येथून दिनांक 01 ऑक्टोबर (बुधवार) रोजी रात्री 20:30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.25. वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07086 – नागपूर ते नांदेड हि गाडी नागपूर येथून दिनांक 02 ऑक्टोबर रोजी रात्री 23.55 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.३० वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे मिळून 20 डब्बे असतील
तर दुसरी गाडी
गाडी क्र. 07087/07088 नांदेड-नागपूर-नांदेड विशेष गाडी मार्गे पूर्णा – बसमत-हिंगोली-वाशीम- अकोला या मार्गे धावेल
गाडी क्र. 07087 – नांदेड ते नागपूर हि विशेष गाडी दिनांक: 01 ऑक्टोबर 2025 (बुधवार) नांदेड येथून प्रस्थान वेळ: रात्री 21:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:10 वाजता, नागपूर येथे (02 ऑक्टोबर) ला पोहोचेल हि गाडी पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावेल.
गाडी क्र. 07088 – नागपूर ते नांदेड हि गाडी नागपूर येथून दिनांक: 03 ऑक्टोबर 2025 (शुक्रवार ) रात्री 01:00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे त्याच दिवशी सकाळी 11:00 वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण 20 डब्बे असतील ज्यात, जनरल, स्लीपर , एस.एल.आर. मिळून 20 डब्बे असतील
– विजय निलंगेकर











