Home / राज्य / विभागीय रेल्वे सल्लागार समितीत विविध विषयावर चर्चा

विभागीय रेल्वे सल्लागार समितीत विविध विषयावर चर्चा

दक्षिण मध्य रेलवे
जनसंपर्क कार्यालय, नांदेड़
प्रेस रिलीज क्र. 875 दिनांक 12.09.2025

विभागीय रेल्वे सल्लागार समितीत विविध विषयावर चर्चा

नांदेड – श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 12 सप्टेंबर, 2025 रोजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक नांदेड विभागीय कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस नांदेड विभागातून विविध ठिकाणाहून 13 सदस्य उपस्थित झाले होते.

डॉ. विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांनी नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कार्याची माहिती दिली, रेल्वे प्रवाश्यांकारिता करत असलेल्या विविध कार्याचे सल्लागार समितीने कौतुक केले. नांदेड विभागात होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती डॉ. विजय कृष्णा यांनी उपस्थितांना दिली.

सल्लागार समिती सदस्यांनी विविध स्थानकावर असलेल्या समस्यांचे समाधान करण्या करिता मागणी केली. नांदेड येथून मुंबई करिता नवीन रेल्वे सुरु करणे, नागपूर-मुंबई रेल्वे पुन्हा सुरु करणे, औरंगाबाद-मुंबई नवीन रेल्वे सुरु करणे, उत्तर भारतात जाण्या करिता नवीन रेल्वे सुरु करणे , विविध एक्स्प्रेस मध्ये डब्बे वाढविणे आदी मागण्या मांडल्या. श्री कामले यांनी कळविले कि नांदेड विभागातून नवीन गाडी सुरु करण्यासाठी नांदेड विभाग दर वर्षी मुख्यालय कडे प्रस्ताव पाठवत आहे. पुढील निर्णय मुख्यालय तसेच रेल्वे बोर्ड घेतील.

श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सर्व सदस्यांना कळविले कि नांदेड विभागाने गत वर्ष भरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन नांदेड – फिरोझपूर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस चा विस्तार, औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, अमृत भारत योजने अंतर्गत 15 रेल्वे स्थानकांचा विकास, नांदेड आणि औरंगाबाद स्थानकांवर प्रीपेड वातानुकुलीत प्रतीक्षालय तसेच बेटरी चालीत लगेज गाडीची सुविधा, प्रवाशांच्या सुविधे करिता विविध ठिकाणी विशेष गाड्या चालविणे, गाड्यांना अतिरिक्त डब्बे जोडणे, आदी महत्वाची कार्य केल्याचे श्री कामले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल