नांदेड महापालिकेसमोर शुक्रवारी ठाकरे पक्षाचे बोंब मारो आंदोल- प्रकाश मारावार
नांदेड – नांदेड महापालिकेचा गलथान कारभाराच्या निषेधार्थ नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवारी 12 सप्टेंबर दुपारी2 वाजता महा नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महानगर प्रमुख प्रकाश मारावर यांनी दिली.
नांदेड महापालिकेचा भष्ट कारभार. दिशाहीन नियोजन. शून्य मास्टर प्लॅन यामुळे नांदेड महापालिकेचे धिंडवडे संपूर्ण शहरात निघत आहे . नांदेड महा पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील हजारो लोकांच्या घरात पाणी घुसले. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास 25000 रुपये महापालिकेने द्यावेत. शहरातील कचरा उचलण्याचे टेंडर100कोटी चे 250कोटी केले. त्यामध्ये 150 कोटींचा घोटाळा याचा जबाब विचारण्यासाठी. तसेच घरकुल योजनेमध्ये महाघोटाळ्याची इडी मार्फत चौकशी करण्यासाठी शिवसेना महानगर च्या वतीने नांदेड महापालिकेसमोर दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता बोंब मारो आंदोलन करण्यात येणारा असून या आंदोलनात शहरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर प्रमुख प्रकाश मारावार. मनोज यादव. शहर प्रमुख जितू सिंघ टाक. अर्जुन ठाकूर. आनंद जाधव. नवज्योत सिंग गाडीवाले. गजानन हरकरे. नितीन सरोदे. शैलेश रावत. ब्रिजलाल उगवे. साहेबराव मामीलवाड. निळकंठ काळे. भाया शर्मा. पिंटू सोनपे. मनोज काकडे. करण इटकल. शिरीष महाबळे. गणेश शहाणे. माधव कल्याणकर. विजय कल्याणकर. किरण देशमुख. गणेश पेन्सिलवार. तुलसीदास नंदाने. सुभाष शिंदे पाटील यांनी केले आहे.











