शेतकरी नागरिकांनी धीर सोडू नये , सरकार आपल्या पाठीशी : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला विश्वास
नांदेड : मुखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे . शेती पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो कुटुंब उघड्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून न जाता धीर धरावा. सरकार आपल्या पाठीशी आहे . निश्चितपणे आपल्या सर्वांना मदत मिळेल असा विश्वास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद , बिहारीपुर , रावणगाव , भेंडेगाव खुर्द , हसनाळ येथे आ. चिखलीकर यांनी आज भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली . यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.
गेल्या दोन दिवसांपूर्वी मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती . हासनाळ येथील पाच जणांचे पुरात बळी गेले . शेकडो गाई म्हशी वाहून गेल्या तर हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत . अनेक गावात पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात हवालदिल झाले होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे आज मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद , बिहारीपुर , रावणगाव , भेंडेगाव खुर्द , हसनाळ येथे भेटी देऊन अतिवृष्टीग्रस्तांशी आस्थेवाईकपणे संवाद साधत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले . शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आलेल्या नैसर्गिक आपत्तीला आपण सर्वच जण तोंड देण्याची गरज आहे. निश्चितपणे शासन आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला सर्वतोपरी मदत मिळेलच असा विश्वास देत असताना ज्या शेतकऱ्यांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे अशा शेतकऱ्यांनाही त्यांनी मदत मिळवून देण्यासाठी आश्वासित केले. शेकडो घरांची पडझड झाली असल्याने घरपडी मिळवून देण्यासाठी आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्यामुळे पंचनामे सुरू होतील मात्र पंचनामे न करता सरसगड मदत जाहीर करावी आणि अतिवृष्टीग्रस्तान तातडीचा दिलासा द्यावा अशी मागणी ही आ. चिखलीकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे . या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, शिवाजीराव कनकटे, निवृत्तीराव कांबळे, अनिकेत पाटील राजूरकर, पंकज देशमुख, नागेंद्र पाटील सांगवीकर, संतोष नारलावार, धीरज पाटील झरीकर, विक्रम नागशेट्टीवाड, राजू पाटील रावणगावकर, मसरोदि्दन पटेल, बाळू पाटील रावणगावकर, बालाजी पाटील लंगोटे, शादुल पटेल, बालाजी आलेवाड, राजेंद्र पाटील खंडागळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.











