अखेर जातीवादी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर गुन्हा दाखल
नांदेड – 15 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरील संविधानाच्या प्रतिकात्मक संविधान पुस्तके चा विटंबना करण्यात आली यावेळी प्रक्षोभक जमावाने दुकान आणि रस्त्यावर जाणारे वाहने अडविली वेळप्रसंगी दगडफेकी झाली उपस्थित जनसमुदाय हाताबाहेर जाईल असा गृहीत धरून पोलिसांनी लाठी चार्ज केला यामध्ये गल्लीबोळात घुसून पोलिसांनी आंबेडकर अनुयायावर लाठी चार्ज केला यातच सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक जो की लॉची डिग्री ची अभ्यास करत होता तो या पोलिसांच्या तावडीत सापडला पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी ही तिथं असल्याने त्यांनी सोमनाथ ला ताब्यात घेतले आणि त्याला मारहाण केली मारहाण एवढी जबर होती की त्याची अवस्था बेकार झाल्याने त्यांनी नंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला घेऊन गेले दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात झाला मृत्यू झाल्याची घटना परभणी मध्ये कळतच अनुयायी आणखी मोठा जमला आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. हे सगळं होत असताना हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक वेळा अशोक घोरबांड यांनी प्रयत्न केले एवढेच नव्हे तर 50 लाख रुपये देण्याचे अमिष दाखवले परंतु सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी या अमिषाला बळी न पडता माझ्या मुलाची हत्या झाली या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे एवढं तिचं म्हणणं होतं प्रशासनाकडून दहा लाख रुपये देण्यात आले होते ते सुद्धा त्यांनी नाकारले अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे एड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशीची केस हातात घेऊन उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू पोलिसांच्या महाराणीतच झाला असे स्पष्ट केले आणि जे पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले परंतु जातीवादी अशोक गुरबांड यांना वाचवण्यासाठी प्रशासन हे सज्ज झाले होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टातही सरकारची बाजू फेटळण्यात आली आणि गुन्हा दाखल करा असा आदेश देण्यात आला. या आदेशान्वये परभणी येथील नवा मोंढा पोलीस स्थानकामध्ये अशोक घोरबांड आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात रात्री बाराच्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जातीवादी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना या प्रकरणातून वाचवण्याचा भरपूर प्रयत्न झाला एवढेच नव्हतंऱ् माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात लक्ष देऊन जातीवादी अशोक घोरबांड याला कसे वाचवता येईल याची लक्ष दिले एवढेच नव्हे तर नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांनीही अशोक घोरबंड यांना वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले विधानपरिषदेमध्ये सभागृहात बोलताना एक विषय मांडून त्यांनी पोलीस या ठिकाणी जर न्यायाधीशांना मारत असेल तर पोलिसांनी शांत बसाव का असे उदाहरण देऊन पोलीस निर्दोष असल्याचे सभागृहात सांगितले परंतु सर्वोच्च न्यायालयापुढे सभागृहाचे काहीही चालले नाही आणि शेवटी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले या प्रकरणात 50 लाख रुपयांचे अमिष पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आल्याची ही नोंद उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये घेण्यात आलेली आहे आता अशोक घोरबांड यांना वाचवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या त्या व्यक्तींच्या विरोधात काय काय भूमिका पुढे चालून घेण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे











