दक्षिण मतदार संघाच्या आमदाराने वाढदिवसावर आवाढव्य खर्च न करता मतदार संघातील गरजू चार पाच दिव्यांगांना आमदार निधीतून स्कुटी वितरित केले असते तर दिव्यांग ऋणी राहिले असते- राहुल साळवे
नांदेड – दक्षिण मतदार संघामध्ये दिव्यांगांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दिव्यांगांना जगण्याचं बळ देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या वतीने त्यांना विविध स्वरूपामध्ये इलेक्ट्रिक स्कुटी, स्वयंचलित तीन चाकी सायकलसह इतर विविध साहित्यांचे वितरण केले जाते परंतु सध्या नांदेड दक्षिणचे आमदार हे वाढदिवसावर अव्वा ढव्य खर्च करत आहेत त्यापैकी थोडासा खर्च दिव्यांगांच्या मदतीसाठी करून दिव्यांगांना जगण्याचं बळ दिलं असतं तर मतदार संघातील दिव्यांग त्यांचे जीवनभर ऋणी राहिले असते असे मत सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे
सध्या लोकप्रतिनिधीं मोठ्या प्रमाणात आपल्या वाढदिवसावर खर्च करत आहे परंतु दिव्यांगांसाठी आमदार-खासदार हे कुठेच शब्दही बोलत नाहीत दिव्यांगांचे प्रश्न सभागृहात मांडत नाहीत त्यामुळे दिव्यांगांना जीवन जगणे अवघड जात आहे. सध्या राज्य व केंद्र शासनाच्या वतीने खासदार व आमदार यांना दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो परंतु हाच निधी आमदार खासदार हे दिव्यांगांवर खर्च करीत नाहीत त्याबाबत संघटनेच्या वतीने आमदार खासदारांच्या घरावर भव्य मोर्चा काढून तसेच पावसाळी अधिवेशन विधानभवन मुंबई येथे धडक मोर्चा काढून लोकप्रतिनिधींना जागं करण्याचं काम दिव्यांग संघटनेने केले आहे परंतु तरीही अद्याप एकही आमदार-खासदार यांनी दिव्यांगांसाठीचा निधी खर्च केला नाही किंवा त्यांना कुठलेच साहित्य सुद्धा वाटप केले नाही. केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेतील साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे सुद्धा श्रेय आमदार खासदारच घेण्यात तरबेज झालेले दिसत आहेत. आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा ३० लक्ष रूपये व खासदार यांच्या एम्पीलैड्स भारत सरकार मधील दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा ३० लक्ष रूपये राखीव निधी खर्च न करता एडीआयपी योजनेतील साहित्य मीच वितरीत केले किंवा हि योजना आम्हीच आणली असा गवगवा करणारे आमदार-खासदार त्यांच्याकडील मात्र दरवर्षीच्या राखिव निधीला हात सुद्धा लावत नाहीत. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेरोजगार दिव्यांगांना तीनचाकी स्कुटीची व इतर अनेक विविध साहित्यांची नितांत आवश्यकता असताना पैशाअभावी ते खरेदी करू शकत नाहीत आणि केंद्राच्या एडीआयपी योजनेतील बॅटरीवर चालणा-या तिनचाकी सायकली फक्त वितरीत करतानाच चालतात त्यानंतर खराब होऊन जातात, बॅटरी फुगुन जाते ते खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे असे निकृष्ट दर्जाचे साहित्य एडीआयपी योजनेत वितरीत न करता इलेक्ट्रिक स्कुटीसह अत्याधुनिक साहित्य वितरीत करण्यात यावे असे सुद्धा साळवे यांनी म्हटले आहे, नुकताच नांदेड दक्षिणचे आमदार यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला यामध्ये त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले परंतु दिव्यांगांसाठी काहीच मदत केली नाही त्यांनी मतदारसंघातील चार-पाच दिव्यांगांना इलेक्टरीक स्कुटीसह इतर साहित्य देऊन मदत केली असती तर दिव्यांगांना जीवन जगण्याचं बळ मिळालं असतं अशी खंत सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे











