आज नांदेड शहरात ठाकरे शिवसेनेचा मेळावा.
नांदेड – नांदेड महानगर शिवसेनेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसैनिकांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून. या मेळावा निमित्ताने शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महानगर शिवसेना कामाला लागली असून गेल्या अनेक वर्षाचा नांदेड शहराच्या शिवसेनेचा इतिहास बघता परत शिवसेना मुसंडी मारेल अशी चर्चा शहरात चालू आहे. लोकमान्य मंगल कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथे दिनांक 22 जुलै दुपारी दोन वाजता होणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव थोरात साहेब यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी नांदेड हिंगोली चे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रोहिदास चव्हाण. माजी आमदार अनुसया ताई खेडकर. माजी संपर्कप्रमुख धोंडू पाटील. जिल्हाप्रमुख भुजंग पाटील. बबनराव बारसे. ज्योतिबा खराटे. बिडी चव्हाण तर महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वच्छला ताई पुयड. डॉक्टर निकिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. नांदेड शहरातील शिवसेना. युवा सेना. अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी या मेळावास उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर प्रमुख प्रकाश मारावार. दक्षिण शहर महानगर प्रमुख मनोज यादव. शहर प्रमुख आनंद जाधव. शहर प्रमुख अर्जुन ठाकूर. शहर प्रमुख जितू टाक यांनी केले आहे.











