नांदेड – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. २५ जून पर्यंत मुदत असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमात कृषी मुलतत्वे, प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी अवजारे यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती, पीक संरक्षण, तसेच व्दितीय वर्षाकरिता सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुल शेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया, सहकार पतपुरवठा व पणन यासह प्रकल्प अहवालातून आळबी उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, फुल शेती, शेडनेट शेती, कुकूटपालन, वराह पालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योग, इत्यादी उद्योगाल रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते.
कृषि पदवीधारकास कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक, सहकारी साखर कारखाना व महामंडळात नोकरी सधी, शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश झाल्यास कृषी शिक्षक म्हणून शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात सेवेच्या संधी आहेत. कृषी सेवा केंद्र खते व बियाणे परवाना मिळविण्याकरिता पात्र अभ्यासक्रम आहे.
प्रवेश घेण्यासाठी http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नांदेड येथील कृषी तंत्र विद्यालयात प्रवेशाकरिता कोड क्रमांक ४३१२३५ हा असून या करिता विजेश जाधव ९३५६८३९७३८ या क्रमांकावर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी केले आहे.








