Home / राजकारण / प्रकाश मारावार यांची शिवसेना महानगरप्रमुख पदी निवड

प्रकाश मारावार यांची शिवसेना महानगरप्रमुख पदी निवड

नांदेड – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या नांदेड महानगर प्रमुख पदी जेष्ठ शिवसेनिक. प्रकाश मारावार यांची नियुक्ती.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या येन तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खेळी खेळून 1987 पासून कार्यरत असलेले अनुभवी प्रकाश मारावार हे हनुमान गड येथील शिवसेना शाखाप्रमुख पासून ते जिल्हाप्रमुख. सह संपर्क प्रमुख. एसटी कामगार सेनेचे विभागीय सल्लागार वं अनेक निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम केलेले लडाऊ व्यक्तिमत्व प्रकाश मारावार यांना पक्षाने पुढे केले. या निवडी मुळे मारावार यांच्या कार्य पद्धत पाहता महानगरपालिका निवणुकीत रंगात येणार.
शिवसेना पक्षात मोठी दुफळी निर्माण झालेल्या परिस्थितीतही प्रकाश मारावर यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही जिल्ह्यातील अनेक नेते वेगवेगळ्या पदावर असलेले शिवसेना या पक्षाच्या फायदा घेऊन मोठे झालेले पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात गेले अशा अवघड परिस्थिती ही शिवसेना ठाकरे गट पुढे भेटण्यास प्रकाश मारावर यांचा नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा वाटा राहिला आहे अनेक प्रसंगी पक्षांतर्गत बंडाळी उठली त्यातही त्यांनी संयमाची भूमिका घेऊन पक्ष एकजुटीचा प्रयत्न केल्याने त्यांच्या या कार्याला पावती म्हणून उद्धव ठाकरे यांनी मारा वार यांना महानगर प्रमुख म्हणून निवड केली आहे अर्थातच येत्या काही काळात महानगरपालिकेच्या निवडणुका असून या निवडणुकीमध्ये मारावर कशाप्रकारे या पक्षाला यश मिळवून देतील याकडे जनतेचे लक्ष लागले असून ते पक्षप्रमुखांच्या अपेक्षांना पूर्ण करतील का असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *