Home / राजकारण / काँग्रेसची मशाल रॅली रद्द करण्यात आली

काँग्रेसची मशाल रॅली रद्द करण्यात आली

नांदेड – अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीन दिवस दुखवटा पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी शहरात होणारी मशा रॅली स्थगित करण्यात आली आहे.
सुधारित तारीख १५ जूननंतर कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या
गैरप्रकाराविरोधात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मशाल रॅली काढण्यात येणार होती. मात्र गुजरातमधील अहमदनगर येथे गुरुवार रोजी एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळून मोठा अपघात झाला. सदरची घटना अत्यंद दुःखद असल्याने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पुढील तीन दिवस दुखवटा पाळण्यात येत आहे. यामुळे शुक्रवारी होणारी मशाल रॅली स्थगित करण्यात आली आहे. १५ जूननंतर मशाल रॅलीची सुधारित तारीख कळविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल