Samyaknews

खा.अशोकराव तुम्ही पण माफी मागणार का?

नांदेड-राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव नको असा पवित्रा घेवून राष्ट्रवादीत मटकाकींगला प्रवेश देण्याच्या प्रकरणावरुन भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बदनामीच्या कटघरात उभे करण्याचा डाव रचण्यात आला. चिखलीकरांनी कळत न कळत झालेली चूक कबूल करुन पक्षश्रेष्ठींची माफी मागून ‘त्या’ मटकाकींगला व त्याची शिफारस करणार्‍या कार्यकर्त्याला पक्षातून काढून टाकले.
काँग्रेसपासून मुखेडचा मटकाकींग असल्याची माहिती असतानाही खा.अशोकराव चव्हाण यांनी संतोष बोनलेवाड या मटकींगला भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या साक्षीने त्याला भाजपात प्रवेश दिला
हे कृत्य अशोकरावांनी जाणीवपूर्वक केले आहे.
राष्ट्रवादीला उपदेश देणारे भाजपा नेते अशोकराव चव्हाण पक्षश्रेष्ठींची माफी मागून त्या मटकाकींगला
पक्षातून बाहेर काढणार काय?असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते असल्यापासूनच खा.अशोकराव चव्हाण यांचे राजकारण मटकाकींग
व गुन्हेगारवृत्तीच्या लोकांच्या जीवावर सुरु होते.
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ‘वन मॅन शो’ असल्यामुळे त्यांना पक्षश्रेष्ठी विचारत नव्हती.
आता ते काँग्रेसमध्ये नसून भाजपात आले आहेत. भाजपाने त्यांना खासदारकी दिली तरीही त्यांची काँग्रेस संस्कृती भाजपातही दिसून येत आहे.
जिल्हा राष्ट्रवादीचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मटकाकींग असलेल्या ‘त्या’ व्यक्तीसोबत घनीष्ठ संबंध नव्हते. त्याची तोंड ओळख देखील नव्हती. एका कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्याला राष्ट्रवादीत प्रवेश दिला गेला. ती चूक त्या कार्यकर्त्याची होती. तरीही मनाचा मोठे पणा
दाखवित आ.चिखलीकर यांनी त्याला व त्याची शिफारस करणार्‍याला पक्षातून काढून टाकून झालेल्या चूकीबद्दल पक्षाचे नेते ना.अजितदादा पवार यांची
माफी मागितल्याचे प्रसारमाध्यामासमोर स्पष्ट केले.
काँग्रेसचे नेते असताना खा.अशोकराव चव्हाण यांनी मुखेडचा मटकाकींग संतोष बोनलेवाड यास मुखेड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल केले होते. संतोष बोनलेवाडच्या घरी जावून त्याची जाहिरपणे पाठराखण करणारे हेच अशोकराव होते. काँग्रेस सोडून भाजपात गेल्यानंतर त्याच संतोष बोनलेवाड या मटकाकींगला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या साक्षीने त्याला भाजपात प्रवेश दिला त्यावेळ त्यांना संतोष हा मटकाकींग आहे. त्याच्या नावावर पोलिस दप्तरी मटकाकींग म्हणून नोंद असल्याचे माहित
असतानाही बोनलेवाड यास भाजपात प्रवेश देवून सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे कृत्य अशोकरावांनी केले आहे. त्याबद्दल पक्षश्रेष्ठींची माफी मागून जाणीवपूर्वक केलेली चूक कबूल करणार
काय?असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर
यांनी केला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ली म्हणून एकेकाळी नांदेड जिल्ह्याची ओळख होती. काँग्रेसचा आमदार होता. राजकीय परिस्थीती बदलली. भाजपाचा आमदार निवडून आला. मुखेडसह जिल्ह्यात काँग्रेसचा गड ढासळत असतानाच अवैध धंदे चालकांच्या हाती पक्षाची धुरा सोपविताना अशोकरावांनी त्याचे
पूर्वचरित्र न तपासताच संतोष बोनलेवाड सारख्या मटकाकींगला युवक काँग्रेसपद बहाल केले होते.
मटका जुगारातून जमवलेल्या पैसावर काँग्रेस पक्षाची संघटना बांधण्यासाठी बोनलेवाड यांनी सुसज्ज पक्षाचे कार्यालय थाटले. अशोकरावासह जिल्ह्यातील त्यावेळच्या मोठमोठ्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या कार्यालयास भेट देवून सत्कार स्विकारले. एकीकडे पक्षाचे काम सुरु असतानाच दुसरीकडे मटका
जुगार मात्र त्याच इमारतीत अखंडीतपणे सुरु ठेवून अवैध व्यवसायाच्या माध्यामातून काँग्रेसचा विस्तार करण्याचा विडा उचलल्यामुळे शहरातील
सर्वसामान्य जनतेच्या मनात काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन भाजपाचा विजय मुखेडमध्ये झाला होता. काँग्रेसची संस्कृती कायम ठेवून अशोकरावांनी आता
भाजपात अवैध धंदे चालकांचा भरणा करण्यास सुरुवात करुन पक्षाची प्रतिमा मलीन करीत आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींनी संतोष बोनलेवाड प्रकरणाची गंभीर
देखल घेवून अशोकराव चव्हाण यांना ही काँग्रेस नाही भाजपा असल्याची समज द्यावी अशी मागणीही रावणगांवकर यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top