Samyaknews

प्रगतीशील लेखक संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नांदेड : येथील ताज पाटील हॉटेल सभागृहात प्रगतीशील लेखक संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.जी.के.ऐनापुरे
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत प्रगतीशील लेखक संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी डॉ.प्रकाश मोगले, डॉ.शत्रुघ्न जाधव ,.प्रा.डॉ.संजय बालाघाटे, डॉ. ज्ञानेश्वर डाखोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रगतीशील लेखक संघाच्या नूतन कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. संतोष हंकारे, जिल्हा सचिव प्रा.डॉ.गजानन देवकर, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.पंजाब शेरे, शहराध्यक्ष डॉ.गजानन इंगोले, जिल्हा सहसचिव प्रा.डॉ.सुभाष रगडे , जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सचिन खडके, शहर सचिव शीलवंत वाढवे, शहर उपाध्यक्ष पूजा ढवळे, शहर कार्याध्यक्ष डॉ.रेखा वाडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य – डॉ.व्यंकटी पावडे, डॉ.पंजाब शिंदे, डॉ.संजय झुंबाडे, डॉ.पांडुरंग पांचाळ, डॉ.पंकज मुधोळकर,राजेश टिमकीकर, यांची निवड करण्यात आली आहे. तर सल्लागार समितीत डॉ.रामप्रसाद तौर, डॉ.मा.मा.जाधव, डॉ.प्रकाश मोगले, डॉ.दिलीप चव्हाण यांचा समावेश आहे. यावेळी नवनियुक्त सल्लागार समितीने नूतन कार्यकारिणीचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

– विजय निलंगेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top