Samyaknews

सहा पक्ष म्हणजे सर्व पक्षीय होतो का ?

भारत देशातील कश्मीर या प्रांतात पहलगाम या ठिकाणी 22 तारखेला दहशतवाद्यांनी हल्ला करून जवळजवळ 28 लोकांना यम सदनी पाठवले यामध्ये महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचा समावेश आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायी घटना असून या घटनेच्या निषेध करणेच माणसाला योग्य वाटते कुठल्याही परिस्थितीत कोणीही समर्थन करूच शकत नाही घडलं ते दुर्दैवी असून राजकारण करू नका असं ज्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते सांगत आहेत परंतु नांदेड शहरांमध्ये याच पक्षाच्या नेत्याकडून राजकारण होताना दिसून येत आहे उद्या नांदेड बंदची हाक दिली आहे या नांदेड बंदच्या आव्हानांमध्ये सहा पक्षांच्या लोकांची म्हणा किंवा कार्यकर्त्यांची म्हणा किंवा नेत्यांची नावे आहेत त्यामध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, ही सहा पक्षाचीच कार्यकर्त्यांची नावे असून नांदेड शहरांमध्ये ही सहाच पक्ष आहेत का अशी आता चर्चा होऊ लागलेली आहे वास्तविक पाहता या सहा पक्षांची जी काही कार्यकर्ते आहेत ते सर्व एकमेकांच्या मध्ये गुंतलेली दिसून येत आहेत नांदेडमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष ही नांदेडमध्ये आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आहे समाजवादी पार्टी, मुस्लिम लीग, रिपब्लिकन सेना, एम आय एम आणखी बरेच काही पक्ष आहेत परंतु नावे घेण्यासारखी जी काही पक्ष आहेत या पक्षाच्या लोकांना या उद्या बंद पुकारलेल्या लोकांनी विचारलं तरी का असाही प्रश्न निर्माण होत आहे एवढेच नव्हे तर हे जे सहा पक्ष्यांची नावे आलेली आहेत यांना तरी विचारणा करून नावे घेतलीत का असाही प्रश्न आता नांदेडकरना पडला आहे किंवा सहा पक्ष म्हणजेच सर्वपक्षीय होतो का हा एक फार मोठा प्रश्न आता नांदेडकरांसमोर पडलेला आहे याचे उत्तर शोधणाऱ्या मात्र देशद्रोही ठरविल्याशिवाय हे शांत बसणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top