Samyaknews

फुकट्या प्रवाशांकडून पंधरा लाख रुपयांची वसुली

फुकट्या प्रवाशांकडून पंधरा लाख रुपयांची वसुली

नांदेड दि. १८ नोव्हेंबर २६

नांदेड रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत दोन दिवसांत  २१५५प्रकरणांची नोंद; ₹१५.४४लाखांची वसुली करण्यात आल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा, विनातिकीट प्रवासाला आळा बसावा तसेच रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत  १२ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबर२०२६ रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेमध्ये विभागातील सर्व तिकीट तपासणी पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही दिवशी एकूण ५८ तिकीट तपासणी कर्मचारी आणि ४ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले. एकूण ५३ रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या अनियमित प्रवासाची एकूण २१५५ प्रकरणे आढळून आली असून, त्यातून एकूण ₹१५४४३१५ इतकी रक्कम वसूल करण्यात आली.

१२ नोव्हेंबर रोजी सकाळी 00:00 ते रात्री२३.५९ या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि दोन RPF कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण २७ रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान खालीलप्रमाणे प्रकरणे आढळून आली  तिकीट नसलेला प्रकरणे: ७१७ भाडे  ₹२९४५१०  दंड  ₹ ३६४५०० अनियमित प्रवास प्रकरणे ३१८ भाडे  ₹१०७६९० दंड  ₹१६०९३०  बुक न केलेले लगेज प्रकरणे: २७६ वसूल रक्कम  ₹४७९७० या दिवशी एकूण १३११ प्रकरणांची नोंद करण्यात आली आणि ₹९७५६०० इतकी रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत अनधिकृत फेरी वाल्यांविरूद्ध १ प्रकरण नोंदवून ₹२००० दंड वसूल करण्यात आला.

१६ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ ते रात्री ८ या कालावधीत सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सहभागाने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २९ कर्मचारी आणि २ RPF कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण २६ रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान तिकीट नसलेला प्रकरणे ५२३ भाडे  ₹२१२६६० दंड ₹२६१५०० अनियमित प्रवास प्रकरणे६८ भाडे  ₹२४७३५ दंड  ₹ ३४३०० बुक न केलेले लगेज प्रकरणे २५३ वसूल रक्कम  ₹ ३५५२० या दिवशी एकूण ८४४ प्रकरणे नोंदविण्यात आली असून ₹५६८७१५  इतकी रक्कम वसूल करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अशा विशेष तपासणी मोहिमांचा मुख्य उद्देश विनातिकीट तसेच अनियमित प्रवासाला प्रतिबंध करणे, योग्य तिकीट घेऊन प्रवास करण्याबाबत प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करणे हा आहे.   तसेच रेल्वेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जबाबदार प्रवास संस्कृती निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्यात येत आहेत. या दोन्ही विशेष मोहिमांचे निरीक्षण श्री. शैलेश कुमार, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी नेहमी वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा, रेल्वेच्या नियमांचे पालन करावे आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top