Home / राज्य / नांदेड शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही – महापौर कविता मुळे

नांदेड शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही – महापौर कविता मुळे

नांदेड शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही – महापौर कविता मुळे

नांदेड दि. ०६ मे
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी दि.०५ मे २०२६ रोजी महापालिकेच्या मुख्यालयात पाणीपुरवठा विभागाचा सविस्तर आढावा घेतला.शहरातील जलसाठा मुबलक असला तरी वितरणातील त्रुटी दूर करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीस *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेता ॲड महेश कनकदंडे, गटनेता संदिपसिंघ गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर जयश्री पावडे, नगरसेवक अभिषेक सौदे, आशिष नेरलकर, तुलजाराम यादव, दिलीप कंदकुर्ते, नगरसेवक प्रतिनिधी निलेश पावडे, संतोष मुळे, किशोर भवरे, बजरंगसिंह ठाकुर, नागनाथ गड्डम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे व पाणी पुरवठा विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी पाणी पुरवठा विभागा मार्फत पाणी पुरवठ्याची सद्य‍स्थीती व आगामी काळात अमृत २.० योजने अंतर्गत होणाऱ्या कामांची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले. तदनंतर विष्णुपूरी धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून शहरासाठी पाणी कपातीची आवश्यकता नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. दुरुस्ती कामांना प्राधान्य देऊन जलवाहिन्यांमधील गळती त्वरित शोधून त्या दुरुस्त कराव्यात, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल. कौठा भागासह शहरातील विविध भागांत प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आलेल्या मीटर यंत्रणेचा आढावा घेण्यात यावा. ज्या ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा खंडित झाला आहे, तिथे तज्ज्ञ कर्मचाऱ्यांमार्फत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.पाणी उपसा केंद्र व जलशुध्दीकर केंद्रावर वीज खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी महावितरणसोबत समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुख्य शहराव्यतिरिक्त नवीन वसाहती आणि नगरांमध्ये जेथे पाणी कमी दाबाने येते, तेथील समस्या तातडीने दुर करुन सुरळीत पुरवठा करण्याचे नियोजन करण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल