Home / सामाजिक / अतिक्रमण विरोधी माणगाव तालुका बौद्ध समाजाचे उपोषण तूर्तास स्थगित

अतिक्रमण विरोधी माणगाव तालुका बौद्ध समाजाचे उपोषण तूर्तास स्थगित

अतिक्रमण विरोधी माणगाव तालुका बौद्ध समाजाचे उपोषण तूर्तास स्थगित

बोरघर / माणगांव दि. ६ मे
रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील खांडपाले या गावातील रहिवासी श्री. पंढरी शांताराम बोले यांनी खांडपाले बौद्धवाडीत जाणाऱ्या दैनंदिन रहदारीच्या रस्त्यावर आपल्या राहत्या घराचे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता वाढीव अनाधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे खांडपाले बौद्धवाडीत जाण्याचा पिढीजात सार्वजनिक रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे खांडपाले बौद्धवाडीतील रहिवाशांची सर्वार्थाने फार मोठी कोंडी आणि सामाजिक कुचंबणा झाली आहे. त्यांना आपल्या दैनंदिन उदरनिर्वाह व उपजीविके साठी, दैनंदिन कामकाजासाठी, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्या व‌स्तीत ये जा करण्यासाठी या रस्त्या व्यतीरिक्त दुसरा अन्य पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. या बाबतची लेखी तक्रार खांडपाले बौद्धवाडीतील रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाला, खांडपाले ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक मनोहर शितकर, पंचायत समिती बिडिओ, तालुका प्रशासन व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सदरचे बांधकाम ग्रामपंचायत अधिनियम १९५८ / ५२ (१) चां भंग तथा उल्लंघन करून केल्याचे प्रशासनाला दिसून आले, सदरचे बांधकाम करण्यासाठी संबंधित घरमालक श्री. पंढरी शांताराम बोले यांनी संबंधित ग्रामपंचायती कडून कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी घेतली नाही. त्यामुळे ते बांधकाम पूर्णपणे अवैध, अनाधिकृत, बेकायदेशीर असून ते सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमण आहे असे शासनाने घोषित केले. आणि ते दिलेल्या मुदतीत ग्रामपंचायत प्राप्त अधिकार कलम ५३ नुसार लवकरात लवकर पाडून खांडपाले बौद्धवाडीत जाणारा सार्वजनिक रहदारीचा रस्ता मोकळा करावा असे शासनाने संबंधित यंत्रणेला आदेश पारित केले आहेत. तसेच संबंधित ग्रामपंचायतीने अतिक्रमण करणाऱ्या संबंधित घरमालक यांना सदरचे बांधकामासह सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ पाडावे अशी नोटीस बजावून सुचना दिली आहे. मात्र दोन्हीं कडून अद्याप प्रत्यक्षात कारवाई अथवा बांधकाम पाडून सार्वजनिक रस्ता पूर्ववत मोकळा करून देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. सदर प्रकरणाला तब्बल चार महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही अतिक्रमण विरोधी ठोस कारवाई करण्यात आली नाही. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सदर संवेदनशील प्रकरणाकडे जाणिवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.
खांडपाले बौद्धवाडीतील स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सदर रस्ता अतिक्रमण प्रकरणी सन २०१८ पासून आम्ही शासन स्तरावर तक्रार, पत्रव्यवहार करून सनदशीर मार्गाने लढा देत आहेत, मात्र हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपामुळे, वरदहस्तामुळे प्रलंबित आणि अनिर्णित राहिले आहे. त्यामुळे हे प्रकरण दोन समाजात जातीय द्वेष आणि तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवणारे आहे.
सदर संवेदनशील आणि गंभीर प्रकरण शासन स्तरावर सनदशीर मार्गाने सोडवण्यासाठी खांडपाले बौद्धवाडी आणि संपूर्ण माणगाव तालुका बौद्ध समाज यांच्या माध्यमातून सोमवार दिनांक ०४ मे रोजी माणगाव तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या संवेदनशील प्रकरणात माणगाव तहसीलदार माननीय विपीन लोकरे साहेब यांनी उपोषण करण्याच्या तयारीत असलेल्या खांडपाले बौद्धवाडीतील रहिवाशी व माणगाव तालुका बौद्ध समाज बौपस माणगाव तालुका अध्यक्ष मा. रविंद्र मोरे, गोरेगांव विभाग अध्यक्ष विकास दादा गायकवाड आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माणगाव तालुका गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांना फोन केला परंतू गटविकास अधिकारी शासकीय कार्यक्रमानिमित्त १५ मे पर्यंत बाहेर आहेत असे समजले. दरम्यान त्यांच्या पदाचा कार्यभार सहायक गटविकास अधिकारी मानसी रहाटे मॅडम यांचेकडे सुपूर्द करण्यात आला असल्याने त्यांना तात्काळ तहसीलदार साहेबांनी आपल्या दालनात बौद्ध समाजासमोर बोलावून घेतले आणि सदर अतिक्रमण विरोधात शक्य तितक्या लवकर ठोस भूमिका घेऊन शासन स्तरावर प्रशासकीय बंदोबस्तात सदरचे अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासक आदेश काढून त्याची एक एक प्रत संबंधित शासन प्रशासन आणि उपोषणकर्त्या बौद्ध सामाजाला देण्याचे सूचित केले. त्या प्रमाणे सहायक गटविकास अधिकारी मानसी रहाटे मॅडम यांनी खांडपाले बौद्धवाडीत जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावरील सदरचे अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण १२ मे २०२६ ला शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या शासकीय बंदोबस्तात पाडून खांडपाले बौद्धवाडीत जाणारा रस्ता मोकळा करण्यात येईल असे उपोषणकर्त्या बौद्ध सामाजाला आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव चे अध्यक्ष माननीय रवींद्र मोरे आणि माननीय विकास दादा गायकवाड पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग अध्यक्ष तथा विश्वस्त, बौद्धजन पंचायत समिती गट प्रतिनिधी गोवा आणि कोकण यांना त्या आदेशाची लेखी प्रत देऊन कारवाईची हमी देऊन आश्र्वासित केले. आणि सदरचे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान राखून समाज धुरीण मा. रविंद्र मोरे आणि विकास दादा गायकवाड यांनी उपस्थित माणगाव तालुका बौद्ध समाजाला उपोषण तूर्तास स्थगित करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेत आपापल्या घरी परतण्याची विनंती केली.
सदर उपोषणासाठी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव चे अध्यक्ष,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय रवींद्र मोरे साहेब, पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विश्वस्त,विभाग अध्यक्ष तथा बौद्धजन पंचायत समिती गोवा कोकण प्रांताचे गट प्रतिनिधी माननीय विकास दादा गायकवाड साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ तथा पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग मुंबई विश्वस्त ॲड. विलास लोखंडे साहेब, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे माननीय सुर्यकांत कासे सर, माणगाव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीचे माननीय संतोष कासारे सर, सिंबॉल ऑफ नॉलेज चे अध्यक्ष सुशिल कासारे, अशोक गायकवाड बौपस अध्यक्ष निजामपूर विभाग, सुनील मोहिते, जितू पवार, आदित्य मोहिते, प्रवीण तांबे, विशाल मोरे, लक्ष्मण मोरे,रोहण साळवी, स्वप्नील साळवी, बबन हाटे, विजय जाधव,रोहण साळवी, रामदास जाधव, संदेश मोरे, श्रीधर तांबे, रमेश घोगरे,जगन्नाथ तांबे, वत्सला मोरे, संजय मोरे, संजीवनी मोरे, सुबोध मोरे, सुशिला मोरे,प्रेमा साळवी, सुनंदा लोखंडे, दिनेश लोखंडे,सुजल लोखंडे, प्रकाश लोखंडे, सुरेश लोखंडे, पुष्पा लोखंडे, शैलेश लोखंडे, पंकज लोखंडे पल्लवी लोखंडे, अनिता लोखंडे, विजय लोखंडे, नितेश लोखंडे नमिता लोखंडे, यशवंत लोखंडे, योजना लोखंडे, निर्मला साळवी,भारत साळवी, संतोष मोरे, तन्वी मोरे, मनोहर लोखंडे, संतोष साळवी, स्वप्नील मोरे, नरेश मोरे, राहुल तांबे, राजेश तांबे, वैभव लोखंडे, रोहित लोखंडे, श्रेयस लोखंडे,दिप्तेश लोखंडे, सुदेश जाधव,उमेश जाधव, विजय मोरे,सागर गायकवाड शैलेश तांबे इत्यादी शेकडो समाज बांधव आणि भगिनी वर्गाचा ताफा उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल