Samyaknews

संतोष पांडागळे हे सुधाकर पत्रभूषण पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

संतोष पांडागळे हे सुधाकर पत्रभूषण पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

नांदेड दि. 22
येथील दीनदयाल उपाध्याय प्रतिष्ठानतर्फे मानाचा समजला जाणाऱा व ज्येष्ठ संपादक कै. सुधाकरराव डोईफोडे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सुधाकर पत्रभूषण पुरस्काराने जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांना दि. 21 रोजी एका भव्य कार्यक्रमात सन्नानित करण्यात आले.
धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून मागील अनेक वर्षांपासून नांदेड भूषण व सुधाकर पत्रभूषण पुरस्कार देऊन समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिंना सन्मानित करण्यात येते. 2024 च्या सुधाकर पत्रभूषण पुरस्काराने संतोष पांडागळे यांना रोख रक्कम पाच हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते सपत्निक सन्मानित करण्यात आले. यावेळी दिलीप ठाकूर, स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, मनपाचे माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे, गंगाप्रसाद तोष्णीवाल, ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त चौधरी, अभय कुळकजाईकर, पन्नालाल शर्मा, रामेश्वर काकडे ,शीतल खांडील आदींची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top