Samyaknews

शिंदे गटाच्या आमदाराच्या गावात ठाकरे सेनेने प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शक्ती प्रदर्शन.

शिंदे गटाच्या आमदाराच्या गावात ठाकरे सेनेने प्रचाराचा नारळ खा. आष्टीकर यांच्या हस्ते फोडून जोरदार शक्ती प्रदर्शन.

नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ठाकरे सेनेने प्रचाराची सुरुवात शिंदे सेनेच्या आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गावातून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नारळ फोडून सुरुवात केली. नांदेड शहरात ठाकरे सेनेने विविध प्रभागात प्रबळ उमेदवार देऊन आव्हान निर्माण केले. आज प्रभाग क्रमांक 1 चे ठाकरे सेनेचे उमेदवार विजय कल्याणकर.शितल कलाने. प्रियंका काकडे. रवी नागरगोजे यांच्या प्रचारार्थ तरोडा खुर्द येथील ग्रामदैवत ला साकडे घालून. नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बोलताना म्हणाले की शिंदे गटाचे आमदार यांच्या गावात जी परिस्थिती आहे हे पाहता येथील लोकच येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या रूपातून धडा शिकवतील असा ठाम विश्वास ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केला. ग्रामदैवत यांना साकडे घालून वाजत गाजत प्रचाराची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भावसार चौक येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आष्टीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

नांदेड महानगरपालिका ठाकरे सेनेच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख भुजंग पाटील.बवन बारसे. गोपू पाटील. मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार. युवा सेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर यांच्या सह या भागातील आमदार पुत्राच्या विरोधात दंड थोपटून उभा टाकलेले निष्ठावंत शिवसैनिक विजय कल्याणकर. सर्वसाधारण महिला गटातून शितल कलाने. ओबीसी पुरुष गटातून रवी नागरगोजे. मागासवर्गीयातून सौ प्रियंका काकडे. ज्येष्ठ शिवसैनिक माधवराव कल्याणकर यांच्यासह या भागातील शेकडो भूमिपुत्र. निष्ठावंत शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top