Samyaknews

छायाताई बैस चंदेल यांचे आर्थिक योगदानातुन जानापुरी जि प शाळेत वाचनालय व वाचनकट्टा.

छायाताई बैस चंदेल यांचे आर्थिक योगदानातुन
जानापुरी जि प शाळेत वाचनालय व वाचनकट्टा.

नांदेड दिं 29 (प्रतिनिधी)
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी शिवाय स्पर्धेच्या युगात ते अधिकाधिक कार्यक्षम व्हावेत
या उदात्त हेतूने जानापुरी ता. लोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानमंदिर वाचन कट्टा व वाचनालयाचा शुभारंभ दि 27 डिसेंबर रोजी सुरु करण्यात आला आहे.
या महत्वकांक्षी उपक्रमांचे शैक्षणिक वर्तुळात स्वागत होत असुन या साठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत धडपडणाऱ्या उपक्रमशील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका छायाताई बैस-चंदेल यांनी दिलेले आर्थिक योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सामाजिक जाणिवेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत ,बौध्दिक क्षमतेत व सामान्य ज्ञानात भर पडावी या साठी धडपडणाऱ्या शिक्षक आजही या स्वार्थी युगात उपलब्ध असल्याचा प्रत्यय या उपक्रमाने अधोरेखित केला आहे.
छायाताई बस चंदेल यांनी त्यांचे वडील स्वर्गीय तुकाराम सिंह बैस यांचे स्मरणार्थ हा प्रेरणादायी उपक्रम सुरु केला.या साठी शाळेस एकेवीस हजार रुपयांची बाल वाचनालयाची पुस्तके व एक लोखंडी कपाल भेट केले आहे.या प्रसंगी मुख्याध्यापक बालाजी नरवाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी इंजि. गणेशसिंह चंदेल , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका सविता कदम, विनायक देबडवार, प्रभावती तम्मेवार, मीरा कदम, मनीषा माळवतकर आदी शिक्षकवृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

ज्या समाजाने आम्हाला सर्व काही दिलं आहे त्याचे ऋण फेडणं कदापी शक्य नाही जे शक्य आहे तितका थोडा फार खारीचा वाटा उचलला पाहिजे याच विचाराने प्रेरित होऊन माझ्या सेवेत हे व्रत सातत्याने करत आले आहे.यामधुन मला लाख मोलाचे मानसिक समाधान लाभते आहे. – छायाताई बैस-चंदेल, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top