Samyaknews

२७ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोह्यात जाहीर सभा

२७ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोह्यात जाहीर सभा

नांदेड दि २५
लोहा व कंधार नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी लोहा येथे जाहीर सभा होणार असून, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आदी नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी एकनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता बैल बाजार, लोहा येथे ही मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होईल. लोहा नगरपरिषदेतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी तसेच कंधार नगरपरिषदेतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार यांच्यासह दोन्ही शहरातील नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोहा विधानसभेचे भाजपा प्रभारी एकनाथ पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच जाहीर सभा असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top