Samyaknews

डीआरएम श्री प्रदीप कामले यांनी विकासकामांची पाहणी केली

डीआरएम श्री प्रदीप कामले यांनी विकासकामांची पाहणी केली
नांदेड – दिनांक 25 रोजी नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी विशेष निरीक्षण दौऱ्यात मानवत रोड, सेलु, परतूर, रोटेगाव आणि नागरसोल या स्थानकांवरील अमृत स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर पाहणी केली.

दौर्‍यात स्टेशन उन्नयन, प्रवाशी सुविधा वाढविणे, स्वच्छता, सर्क्युलेशन एरिया, वेटिंग हॉल, प्लॅटफॉर्म सुधारणा तसेच मूलभूत सुविधांवरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

मानवत रोड – सेलू – परतूर – रोटेगाव – नागरसोल या अमृत स्टेशन स्थानकांवरील कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सुरु असलेल्या विकास कार्याचा आढावा घेण्यात आला , संबंधीत अधिकारी यांना उपयुक्त सूचना देण्यात आल्या.

तसेच या दौऱ्यात परभणी – नागरसोल दरम्यान रिअर विंडो इन्स्पेक्शन करण्यात आले. ज्यात कामले यांनी परभणी –नागरसोल दरम्यान असलेल्या विविध रेल्वे फाटक, सिग्नल पोस्ट, रेल्वे पटरी तसेच इतर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या संसाधनांची पाहणी केली.

नागरसोल – तारूर स्थानकांदरम्यान किमी 31/15–32/1 वरील रेल्वे फाटक क्रमांक -13 ऐवजी रेल्वे भुयारी पुलाचे बांधकाम सुरु आहे, या रेल्वे कार्याची त्यांनी पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात कामले यांच्या सोबत अभियांत्रिकी विभागाचे, परिचालन विभागाचे, विद्युत विभागाचे, तसेच वाणिज्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top