काँग्रेस पक्षाची घटक पक्षातील नेत्यांची बैठक संपन्न
नांदेड – आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पक्ष कार्यालय नवा मोंढा नांदेड येथे बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी सहभागी होऊन आगामी निवडणुकीसाठी युतीच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा केली.
बैठकीस माजी मंत्री डॉ.माधवराव किनाळकर, माजी मंत्री सूर्यकांता ताई पाटील,खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, शिवसेनेचे नेते भुजंग पाटील
या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली बैठकीत जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढण्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय वाढवून प्रत्येक तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीत वक्त्यांनी लोकशाही मूल्ये जपण्यासाठी व भाजपा-शिंदे सरकारच्या विरोधात एकजुटीने लढण्याची गरज अधोरेखित केली. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन स्थानिक पातळीवर जनाधार मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीच्या शेवटी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे एकत्रित बळ वाढवण्यासाठी नियमित समन्वय बैठक घेण्याचे ठरविले.
या बैठकीला ईश्वरराव भोसीकर, रोहिदास चव्हाण, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे,अब्दुल सत्तार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर राष्ट्रवादी शहराध्यक्ष डॉ. सुनील कदम शिवसेना नेते ज्योतिबा खराटे राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश तादलापूरकर, मसूद खान,आनंदराव पाटील चव्हाण , एकनाथराव मोरे ,गायकवाड, यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..











