Samyaknews

अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत नांदेड पोलीस आमलदारांचे यश

पोलीस दलातर्फे केरळ राज्यातील कोची येथे पहिली अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आणि नांदेड शहरातील पोलीस दलात कार्यरत असलेले सुषमा लोखंडे आणि मिलिंद लोणे यांनी पदके मिळवून यश संपादन केले आहे या यशाबद्दल त्यांचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गौरव करून त्यांना बक्षीसही जाहीर केले आहे. सदर स्पर्धेसाठी नांदेड येथून पोलिस मुख्यालय येथे कार्यरत असलेले मिलिंद लोणे यांनी एकेरी टेबल टेनिस या स्पर्धेत आणि महिला स्पर्धेत सुषमा लोखंडे मिक्स दुहेरी टेबल टेनिस या प्रकारात यश मिळवले आहे
ही स्पर्धा एप्रिल महिन्यामध्ये केरळ राज्यातील कोची या येथे राजीव गांधी स्टेडियम मध्ये घेण्यात आली.

Oplus_0

या स्पर्धेमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद माणिकराव लोने यांनी एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत कांस्य पदक पटकावले तर महिला पोलीस आमलदार सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे यांनी मिक्स टेबल टेनिस स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून नांदेड पोलीस दलाचे नावलौकिक वाढविले आहे या मिक्स डबल मध्ये त्यांच्या सोबत परभणी येथील पोलिस कॉन्स्टेबल गौस पठाण यांनी साथ दिली या त्यांच्या यशाबद्दल नांदेड परिक्षेत्राची पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराव धरणे व पोलीस उपाधीक्षक गृह श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा गुट्टे यांनी अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या खेळाडूंना तीन हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
देशपातळीवर झालेल्या या स्पर्धेमध्ये नांदेडच्या पोलीस खेळाडूंनी आपला नावलौकिक केल्यामुळे जिल्हा पोलीस दलाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

– विजय निलंगेकर

बातम्या व जाहिराती साठी संपर्क 8668783613

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top