भारताच्या सरन्यायाधीशावरील हल्ल्याविरोधात १४ ऑक्टोबर रोजी भव्य मूक मोर्चा
छत्रपती संभाजीनगर : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर कोर्टामध्ये भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्यावर भारतभर, जगभर संताप व्यक्त केला जात आहे. त्या विरोधात अनेक निदर्शने, मोर्चे, प्रतिक्रिया उमटत आहेत. हा हल्ला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर नसून न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे. हा हल्ला सरन्यायाधीशावर नसून भारतीय संविधानावर आहे. या हल्ल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील चळवळीतील सर्वांनी एकत्र येवून प्रतिक्रिया देण्याचे ठरवले. तेव्हा एक भव्य मूक मोर्चा काढण्याचे ठरले. हा मोर्चा वुई द पिपल अर्थात ‘आम्ही भारताचे लोक’ यांच्या वतीने दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर असा भव्य मोर्चा निघणार आहे.
हा मोर्चा क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, किले अर्क, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चामध्ये सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन ‘*आम्ही भारताचे लोक*’ च्या वतीने करण्यात येत आहे.











