गोर बंजारा तीज महोत्सवाचे नांदेड येथे aayojan
नांदेड – येथे मागील 20 वर्षापासून गोरबंजारा तिज महोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवात बंजारा समाजाची रुढी-परंपरा, वेशभूषा, नृत्य, गाणे व संस्कृतीचे जतन केल्या जाते, सातत्याने 20 वर्ष कोणताही महोत्सव साजरा करणे कठीण जरी असले तरी नांदेड शहरातील तिज महोत्सव समिती, मोठया उत्साहात 9 दिवसाचा सोहळा आनंदाने साजरा करत असतात, या वर्षी दि.8.8.2025 पासून 16.8.2025 पर्यत हा सोहळा चालणार आहे. यात पारंपारिक नृत्य, ओपन स्पर्धा, आनंदनगरी, जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा सत्कार होणार आहे.
दि. 15 ऑगस्ट रोजी ढंबोळी पुजा व पिडीया खोसेरो (मुलामुलींचे) कार्यक्रम पार पडल्यानंतर, गोकुळ आष्ठमी पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. ईशान चव्हाण यांचे गितांजली कार्यक्रम दि. 12 ऑगस्ट रोजी होणार आहे व दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. महाप्रसाद व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लोकमान्य मंगल कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहण्याचे आव्हान तिज उत्सव समितीच्या वतिने अध्यक्ष डॉ. सौ. निकीता बी. चव्हाण, सौ.माला पवार (सचिव), सौ. सिमा राठोड (कोषाध्यक्ष), सौ. श्रध्दा चव्हाण, सौ. देवका राठोड, सौ. वर्षा चव्हाण, डॉ.माया पवार, सौ. सुनिता पवार, सौ. सविता चव्हाण, सौ. गीता राठोड, सौ. लक्ष्मी राठोड, सौ. सुनिता आडे, सौ. वंदना जाधव, सौ. नंदा राठोड, सौ.अरुणा राठोड, सौ. सुनिता चव्हाण, सौ. अनिता राठोड, डॉ.सौ. शिल्पा चव्हाण, सो. ललीता राठोड, सौ. मनोरमा राठोड, सौ. पुजा राठोड, सौ. शोभा चव्हाण, सौ. सोनम चव्हाण, स्वाती पंदिप चव्हाण, प्रिया राठोड यांनी केले आहे.
– विजय निलंगेकर











