22 जुलै रोजी नांदेड महानगर शिवसेनेचा भव्य मेळावा
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड महानगर शिवसेनेतर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 22 जुलै 2025 दुपारी 2 वाजता. लोकमान्य मंगल कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथे होणार असून. या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेता अंबादास जी दानवे साहेब यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव जी थोरात साहेब राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब. माजी आमदार अनुषाताई खेडकर. धोंडू पाटील. जिल्हाप्रमुख भुजंग पाटील. बबनराव बारसे. बिडी चव्हाण. महिला आघाडीच्या वच्लाताई पुयड. डॉक्टर निकिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणारा आहे. नांदेड महानगर शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या भव्य मेळाव्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून. नांदेड शहरातील शिवसैनिकासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास शिवसेना. युवा सेना. महिला आघाडी. अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर प्रमुख प्रकाश मारावार. नांदेड दक्षिण शहर चे महानगरप्रमुख मनोज जाधव. शहर प्रमुख आनंद जाधव. शहर प्रमुख अर्जुन ठाकूर. सिडको हडकोचे शहर प्रमुख जितू टाक आधी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.










