Samyaknews

विद्यापीठ-उद्योग भागीदारीतून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचा विश्वास

नांदेड :विद्यापीठाकडे तरुण, ऊर्जावान मनुष्यबळ आहे. उद्योजकांच्या गरजा समजून घेऊन अभ्यासक्रमात योग्य ते बदल करत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य देण्याची आज आवश्यकता आहे. विद्यापीठ उद्योगांशी सहकार्या सोबतच भागीदारी करू इच्छिते. विद्यापीठ-उद्योग भागीदारीतून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित विद्यापीठ उद्योजक परिसंवाद-२०२५ कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदेड इंडस्ट्री असोसिएशनचे हर्षद शहा, श्री. गणेश महाजन, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्रभारी कुलसचिव डॉ. एम.के. पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्र चव्हाण, डॉ. डी. एम. मोरे, डॉ. संतराम मुंडे, डॉ. संगीता माकोणे, डॉ. शैलेश वाढेर आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते. उद्योजकांच्या वतीने श्री.ओमप्रकाश डागा, श्री.राजेश धूत, श्री. चंद्रकांत गव्हाणे, श्री.अमोल श्रीफुले, श्री.अरुण फाजगे,श्री. सुनील दुबेवार तर प्राचार्य तर्फे डॉ. बी.यु. जाधव व डॉ. के.एस. कणसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजकांनी विद्यापीठाच्या भूमिकेचे कौतुक करत पुढील सहकार्याची ग्वाही दिली. विद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित नसून समाजाला दिशा देण्याचेही आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमात विद्यापीठाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे मत नांदेड इंडस्ट्री असोसिएशनचे हर्षद शहा यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य नरेंद्र चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात उद्योग स्थापनेची संधी मोठी आहे. परंतु येथे मनुष्यबळ असले तरी त्यांच्याकडे आवश्यक कौशल्याचा अभाव आहे. हे चित्र बदलण्यासाठी अप्रेन्टिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सारख्या उपक्रमांची भूमिका निर्णायक ठरेल. यावेळी डॉ. प्रशांत पेशकार व श्री गणेश महाजन यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी अप्रेन्टिसशिपएम्बेडेड डिग्री प्रोग्राम ह्या रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी व महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या या कार्यप्रणाली बाबत पीपीटीद्वारे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी अधिष्ठाता, विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण, नियुक्ती व अंतरवासिता कक्षाचे समन्वयक डॉ. बालाजी मुधोळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी केले. आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. चैतन्य, डॉ. राजकुमार मून यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top