Home / राज्य / महावीर चौक-वजिराबाद मुथा चौक-रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

महावीर चौक-वजिराबाद मुथा चौक-रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

नांदेड, २६ :- महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या विशेष मोहिमे अंतर्गत उत्तर नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ आणि रहदारीसाठी महत्त्वाचा रस्ता म्हणुन ओळखला जाणारा महावीर चौक-वजिराबाद मुथा चौक-रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील रस्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने धडक कारवाई केली असुन शनिवार दिनांक २६.०४.२०२५ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस प्रशासनाने या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढुन टाकले आहे. तसेच त्यानंतर बाफना टी पॉइंट ते देगलूर नगर या परिसरातील अतिक्रमणे महापालिकेने पुनश्च एकदा काढून टाकली आहेत.

मागील काही दिवसांपासुन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असुन आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आपला मोर्चा नांदेड शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वजिराबाद भागाकडे वळविला आहे. त्याअनुषंगाने या भागातील महावीर चौक-वजिराबाद मुथा चौक-रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील अतिक्रमणे काढुन टाकण्याची कार्यवाही महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पार पाडली आहे. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने जवळपास ९० अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल ०२ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे. तसेच बाफना डी पॉइंट परिसरातील संगम कार बाजार व गुड ऑटो डील्स या दुकानदारांनी चार चाकी वाहने रस्त्यावर विक्रीसाठी ठेवून रहदारीस अडथळा केल्यामुळे संबंधित व्यवसाय धारकावर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सदरील कारवाई *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम* यांच्या मार्गदर्शनाखाली *उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत *उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जसपालसिंग* अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, राजेश जाधव, गौतक कवडे, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख अनिल चौदंते यांच्यासह महापालिकेचे ५० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील ४० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल