हजुरी निर्मल टकसाल नंदीग्राम सोसायटी चे संचालक ग्याणी सरबजीत सिंघ जी निर्मेले च्या संकल्पनेतून पहीली ते कॉलेज व उच्च शिक्षण घेणाऱ्या शिख समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन चे वाटप संत बाबा बलविंदर सिंघ जी लंगर साहीब गुरूद्वारा मुखी, संत बाबा हरी सिंघ जी लंगर साहीब, संत बाबा चरण सिंघ जी रतनगड गुरूद्वारा मुखी च्या हस्ते चारशे मुला मुलींना वह्या व पेन चे वाटप करण्यात आले आहे. या वेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचे पालक व नागरीक उपस्थित होते. या वेळी ग्याणी सरबजीत सिंघ जी नी आपल्या संभाषणात शिख समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या वह्या व पेन मोफत देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसेच या सोबत सोबत हजुरी निर्मल टकसाल तर्फे अनेक वर्षांपासून गुरुमुखी लिपी, धार्मिक शिक्षण तसेच महीलाना आत्मनिर्भर करण्यासाठी मोफत शिवणकाम शिकवले जात आहे. ग्याणी सरबजीत सिंघ जीनीं या मागचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीना प्रोत्साहित करने व खरी धार्मिक शिक्षा व रोजगाराभिमुख शिक्षण देऊन चांगला समाज निर्माण करण्यासाठी थोडा वाटा टाकत असल्याचे बोलले.*






