अबब 140 अतिक्रमणधारकावर कारवाई करून तब्बल दोन ट्रक माल जप्त केल्याची माहिती महानगरपालिकेकडून मिळाली आहे परंतु हे करत असताना याच अतिक्रमण धारकाच्या बाजूला असलेल्या अतिरिकमनावर महानगरपालची मेहरबानी का असा प्रश्न आता पडला आहे
महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी मोठा लावाजमा घेत बाफना टी पॉईंट ते देगलूर नाका परिसरातील अतिक्रमणे हटवली हे स्वागतहार्या आहे परंतु ज्या ठिकाणी अतिक्रमणे हटवली त्याच वीस फुटाच्या बाजूला असलेली अतिक्रमण का आठवले नाही असा प्रश्न पडला आहे फुट ओव्हर ब्रिज ज्या ठिकाणी आहे त्याचे एका बाजूची सर्व अतिक्रमण कढण्यामध्ये मनपाला यश मिळाले आहे परंतु दुसऱ्या बाजूला असलेले कुरेशीया हॉटेल यांची जे की शासकीय मालमत्तेला अडथळा करत व शासकीय मालमत्तेचा सहारा घेत त्यांनी जे हॉटेल उभारला आहे ही अतिक्रमण नाही का आता असा प्रश्न पडला आहे हे हॉटेल एका माजी नगरसेवकाची असल्याचे कळते मग या माजी नगरसेवकांनी कुठलं तंत्र वापरलं की या अधिकाऱ्यांना हे अतिक्रमण दिसले नाही अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
देगलूर नका परिसरामध्ये अतिक्रमणधारकांनी अतिरेक केल्यामुळे वाहनांना व पायी चालणाऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागत होते याकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाने लक्ष दिले नाही यामुळे अतिक्रमने वाढले होते पण काल अचानक या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मोठ्या लवाजम्या अतिक्रमणे हटवली अतिक्रमण हटवत असताना येथील नागरिकांनी अभिनंदन केले सरते शेवटी फुट ओहर ब्रिजच्या च्या बाजूला असलेले अतिक्रमण न काढल्याने या अधिकाऱ्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत