Samyaknews

अशोकराव चव्हाण यांचा प्रभाव लवकरच कमी होईल

एखाद्या नेत्याचा प्रभाव असेल तर तो प्रभाव जाण्यासाठी वेळ लागतो आणि नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांचा प्रभाव असल्याचे पक्ष निरीक्षक खासदार कल्याण काळे यांनी मान्य केल्याचे दिसून येत आहे
नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कसा वाढीस लागेल यासाठी प्रदेशाध्यक्ष यांचे आदेशान्वये ज्यांना चे जिल्हा खासदार कल्याण काळे हे नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी गेल्या दोन दिवसापासून नांदेड येथे पक्ष कार्यकर्त्यांची भेटी घेऊन पदाधिकाऱ्यांमध्ये काही बदल करता येईल का याची चाचणी केली आहे सध्याची पक्ष कार्यकारिणी आहे त्यामध्ये काही बदल करायचा किंवा कसे हे सर्व येथील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच बदल केल्या जाईल असेही ते म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रातीलच काँग्रेसच्या जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांची बदल करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष आणि दिल्याचे त्यांनी सांगितले. नांदेडची परिस्थितीवर चर्चा करत असताना ते म्हणाले खासदार अशोकराव चव्हाण यांचा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यावर प्रभाव असून हा प्रभाव कालांतराने कमी होईल असे ते म्हणाले एका प्रश्न उत्तर देताना ते म्हणाले काँग्रेस पक्षाचे वर्चस्व वाढत असून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेवर असेल असे ते म्हणाले यावेळी जिल्हाध्यक्ष बी आर कदम हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर अब्दुल सत्तार नांदेड चे खासदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top