Samyaknews

टीव्ही चॅनलच्या खोटारडेपणा जिल्हा प्रशासनाने उघड केला

टीव्ही चॅनलच्या खोटारडेपणा जिल्हा प्रशासनाने उघड केला
नांदेड-  दि. १८ : विजय निलंगेकर
सध्या टीआरपी मिळवण्याच्या नादात टीव्ही चॅनल्स वाले कुठल्या स्तरावर जातील याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील चारा डेपो प्रकरणात आला असून असे अनेक प्रकार या चॅनलकडून घडले जाते परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधावी हा जो प्रश्न आजपर्यंत सुटला नाही तोच प्रश्न जिल्हा प्रशासनाने सोडवल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.

उमरी तालुक्यातील मौजे गोरठा येथे चारा टंचाई निर्माण झाल्याबाबत तसेच चारा छावणी सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी साम टीव्हीवर प्रसारित झालेल्या वृत्ताची पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी केली. या पाहणीत संबंधित गोशाळेत पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.

पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पशुवैद्यकीय चिकित्सालय, गोरठा तसेच श्री संत दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरठा संचलित गोशाळेस प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध चारा, पशुधनाची स्थिती आणि चारा व्यवस्थापनाची पाहणी केली.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान गोशाळेत पुरेशा प्रमाणात वाळलेला कडबा व सोयाबीन कुटार उपलब्ध असल्याचे आढळून आले. तसेच संबंधित वृत्तातील व्यक्ती आणि गोशाळा व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रसारित वृत्तातील माहिती वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे तसेच संबंधित विधाने जाणीवपूर्वक करण्यास सांगितल्याचे त्यांनी लेखी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असतो समाजात घडलेल्या घटनांचा शासनापर्यंत पोहोचवण्याचा एक माध्यम म्हणून पत्रकाराचा पत्राकाराकडे पाहिले जाते परंतु पत्रकारांनीच प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी किंवा प्रशासनाची बदनामी करण्याची प्रयत्न केल्यास काय घडू शकते याची प्रत्यय नांदेडमध्ये आल्याचे दिसून येते टीव्ही चॅनलच्या टीआरपी वाढावी किंवा स्वतःची टीआरपी वाढवी यासाठी पत्रकार धडपडत असतो पण ही धडपड करत असताना खोटारडेपणाचा आधार कितपत घ्यावा याचा विचार त्याला स्वतःच करावा लागतो परंतु सध्या असा विचार न करणारे पत्रकार शहरात फिरताना दिसून येत आहेत प्रशासनाची बदनामी करण्याच्या नादात जे वृत्त प्रकाशित केले त्या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येऊन त्या वृत्ताचे ऑपरेशन झाल्याने खोटारडेपणा समोर आला आहे असे अनेक वेळा हे पत्रकार खोटारडेपणा करून वृत्त झळकवण्याचा प्रयत्न करतात यामध्ये सामाजिक धार्मिक ते निर्माण होईल की नाही याचा विचार करत नाही परंतु आज जिल्हा प्रशासनाने जे पाऊल उचलले त्या पावलाचे सर्व स्तरातून प्रशंशाह होत असताना दिसून येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top