Home / Uncategorized / मुक्ती दिन निमित्त तपोवन एक्स्प्रेसला नगरसूल येथे तात्पुरता थांबा

मुक्ती दिन निमित्त तपोवन एक्स्प्रेसला नगरसूल येथे तात्पुरता थांबा

नांदेड दि. 11 सप्टेंबर 26

मुक्ती दिन निमित्त तपोवन एक्स्प्रेसला नगरसूल येथे तात्पुरता थांबा

मुक्तिभूमी (अधिकृत नाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एक स्मारक-संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहीर घोषणा केली होती. आंबेडकरवादी जनता व पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून विकसित झाले असून त्यास अनेक लोक भेटी देत असतात. या ठिकाणी विविध उत्सव तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

मुक्ती दिनानिमित्त येवला येथील मुक्तीभूमीला भेट देणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हजूर साहिब नांदेड–मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन एक्स्प्रेसला नगरसूल येथे तात्पुरता अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे.

हा अतिरिक्त थांबा दिनांक 11, 12 आणि 13 ऑक्टोबर 2026 या 3 दिवसांसाठी देण्यात येणार आहे.गाडी क्रमांक 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई–हजूर साहिब नांदेड तपोवन एक्स्प्रेसला नगरसूल येथे 11, 12 आणि 13 ऑक्टोबर 2026 रोजी 11:24 वाजता आगमन व 11:25 वाजता प्रस्थान असा अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 17618 हजूर साहिब नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तपोवन एक्स्प्रेसला नगरसूल येथे 11, 12 आणि 13 ऑक्टोबर 2026 रोजी 15:59 वाजता आगमन व 16:00 वाजता प्रस्थान असा अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे.

या तात्पुरत्या अतिरिक्त थांब्यामुळे मुक्ती दिनानिमित्त येवला येथील मुक्तीभूमीला जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना तसेच इतर प्रवाशांना प्रवासाची अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत चौकशी माध्यमांद्वारे सविस्तर वेळापत्रक आणि आरक्षणाची स्थिती तपासून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *