
दिनांक:08.09.2026
नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) राज्यराणी एक्स्प्रेसला नोव्हेंबर 2026 पासून आधुनिक LHB डबेप्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि प्रवासाचा अनुभव अधिक उंचावण्याच्या दृष्टीने दक्षिण मध्य रेल्वेने गाडी क्र. 17611/17612 नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)–नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसच्या विद्यमान ICF डब्यांऐवजी आधुनिक LHB (Linke Hofmann Busch) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.ही रूपांतरण प्रक्रिया नांदेडहून सुटणाऱ्या गाडीसाठी 04 नोव्हेंबर 2026 पासून आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून सुटणाऱ्या गाडीसाठी 05 नोव्हेंबर 2026 पासून लागू करण्यात येणार आहे.
राज्यराणी एक्स्प्रेसचे संचालन 2 LHB रेकद्वारे करण्यात येणार असून, सुधारित डब्यांची रचना एकूण 16 डब्यांची असेल. यामध्ये 1 द्वितीय सामान-सह-दिव्यांगजन डबा, 4 सामान्य डबे, 5 स्लीपर (नॉन-एसी) डबे, 1 एसी चेअर कार, 2 एसी 3-टियर डबे, 1 एसी 2-टियर डबा, 1 फर्स्ट एसी डबा आणि 1 सामान-सह-गार्ड डबा (जनरेटर व ब्रेक व्हॅनसह) यांचा समावेश असेल.LHB डब्यांच्या समावेशामुळे प्रवाशांना अधिक आधुनिक आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच LHB डब्यांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रवासातील स्थिरता आणि सुरक्षिततेत सुधारणा होण्यास मदत होईल. पारंपरिक ICF डब्यांच्या तुलनेत हे डबे प्रवाशांना अधिक चांगला आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.राज्यराणी एक्स्प्रेसचे LHB डब्यांमध्ये रूपांतर हे प्रवासी सेवांचे आधुनिकीकरण तसेच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा आणि सुरक्षित, आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्याच्या दक्षिण मध्य रेल्वेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे.दक्षिण मध्य रेल्वे आधुनिक रोलिंग स्टॉकचा टप्प्याटप्प्याने समावेश करून आपल्या रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासोबतच प्रवासी-केंद्रित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे असेही पत्रकार म्हटले आहे






