Samyaknews

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माळाकोळीत आरोग्य शिबिर व वृक्षारोपण

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माळाकोळीत आरोग्य शिबिर व वृक्षारोपण

नांदेड दि. 28 जुलै
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची डोळे तपासणी, सिकल सेल, रक्तातील साखर (शुगर), रक्तदाब आदी विविध आजारांची तपासणी केली. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सावली देणाऱ्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना प्रणिता देवरे-चिखलीकर म्हणाल्या की, “पर्यावरणाचा ऱ्हास मानवामुळेच झाला असून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारीही मानवाचीच आहे. प्रत्येकाने किमान सात झाडे लावून त्यांचे संगोपन केले, तर भविष्यातील पिढ्यांना निरोगी आणि शुद्ध पर्यावरण मिळू शकेल.”
या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश कांबळे, डॉ. अनुपसिंग, डॉ. दीपाली काळे, डॉ. प्रकाश नागरगोजे, डॉ. शिंगारे, डॉ. शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, माजी पंचायत समिती उपसभापती रोहित पाटील, माजी सरपंच हनुमंत धुळगुंडे, खेडकर सरपंच, रामदास पाटील, भीमराव नाईक, बाळू बाबर, माजी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर मुरकुटे, गणपत अण्णा तिडके, हणमंत लांडगे, तुकाराम पवार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, रुग्णवाहिका चालक अतिश कांबळे, तसेच मोठ्या संख्येने नागरिक व रुग्ण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच चंद्रमुनी मस्के यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top